युक्रेनविरुद्ध रशियाची लष्करी मोहीम अद्यापही सुरू आहे. रशियन सैन्याने शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला आणि सरकारी निवास स्थानांजवळ गोळ्या आणि स्फोटांचा आवाज आला. या युद्धात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सगळ्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनच्या एका सैनिकाने रशियाच्या सैनिकांना थांबवण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता बलिदान दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युक्रेनमध्ये शिरण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या रशियन रणगाड्यांना रोखण्यासाठी एका सैनिकाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता शत्रूला रोखण्यासाठी बलिदान दिलं. या सैनिकाने रशियन लष्कराला युक्रेनमध्ये घुसण्यापासून रोखण्यासाठी एका महत्वाच्या पूलाच्या तोंडाशी उभं राहून स्वत:ला बॉम्बने उडवून दिलं. यामुळे या ठिकाणी युक्रेनच्या मुख्य भूमिला जोडणारा रस्ताच रशियन रणगाड्यांसाठी बंद झाला.

आणखी वाचा : एवढे पैसे कुठून आले? गाडी घेतल्यानंतर धमक्यांचे फोन; व्हिडीओ शेअर करत युट्यूबरने दिले स्पष्टीकरण

या सैनिकाचे नाव (व्हायटली स्काकुन व्हॉलोडीमायरोव्हिच) Vitaliy Skakun Volodymyrovych आहे. तर व्हायटलीने खेरसन प्रदेशातील हेनिचेस्क पुलावर स्वत:ला बॉम्बने उडवून दिलं. जनरल स्टाफच्या फेसबुक पेजच्या पोस्टनुसार, रशियाला थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हा पूल उडवणे आहे, असा निर्णय त्या बटालियनने घेतला. व्हायटलीला पळून जाण्यासाठी वेळ नव्हता. त्याने त्याच्या साथीदारांना सांगितले की तो स्फोट करणार आहे आणि काही सेकंदात त्यांनी स्फोटाचा आवाज ऐकला. त्यानंतर सैनिक दलाने पुलाजवळ व्हायटलीच्या मृत्यूच झाल्याचे सांगितले.

आणखी वाचा : मुंबई महापालिका आयुक्तांच्या नावाने शिवीगाळ करत धमकी देणाऱ्याचा; व्हिडीओ शेअर करत सोनू निगम म्हणाला, “इक्बाल चहल…”

आणखी वाचा : आई कुठे काय करते : मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट

Gangubai Kathiawadi Box Office Collection Day 1: पहिल्या दिवशी चित्रपटाने कमावले इतके कोटी

काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला असून भीतीने नागरिकांनी भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतला आहे, तर काही नागरिक पश्चिमात्य देशांमध्ये आश्रयाला जात आहेत. शुक्रवारी युक्रेनच्या पश्चिम सीमेवर शेकडो महिला आणि मुले शेजारच्या देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी उभे असल्याचे आढळले. रशियाने मात्र किव्हवर हल्ला केल्याचे वृत्त फेटाळले आणि रशियन सैन्य नागरी भागांना लक्ष्य करणार नाही, असे स्पष्ट केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukrainian soldier blows himself up on bridge to prevent russian advance dcp