युक्रेनविरोेधात युद्धाची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी युद्धाच्या दुसऱ्या दिवशी रशियन सैन्याची आगेकूच सुरूच राहिली. तिसऱ्या दिवशीही रशियाने आक्रमक हल्ले करण्यास सुरुवात केलीय. शुक्रवारीच रशियाकडून युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलेत. एकीकडे रशियाने वेगाने युक्रेनचा प्रदेश ताब्यात घेत असताना दुसरीकडे युक्रेन कडवी झुंज देताना दिसत आहे. अशीच एक घटना युक्रेनच्या ताब्यातील काळ्या समुद्रामधील स्नेक बेटांवरुन समोर आलीय.

नक्की पाहा >> Photos: व्लादिमिर Vs वोलोडिमिर! युक्रेन युद्धात पुतिन यांना नडणारा ‘स्टॅण्डअप कॉमेडियन’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युक्रेनच्या मुख्य भूभागापासून ४८ किलोमीटरवर स्नेक बेट आहे. या बेटाचा आकार फारच छोटा म्हणजे १८ हेक्टर्स इतका आहे. असं असलं तरी लष्करी दृष्ट्या या बेटाला फार महत्व आहे. म्हणूनच रशियाने हल्ला केला तेव्हा या ठिकाणी तैनात असणाऱ्या १३ युक्रेनियन सैनिकांनी बेटाचा ताबा सोडण्यास नकार दिला. त्यानंतर रशियन नौदलाने युक्रेनच्या या १३ सैनिकांना मारुन टाकलं.

नक्की पाहा >> Video: आजींनी रशियन सैनिकाला भरचौकात झापलं; नंतर त्याच्या हातावर सूर्यफुलाच्या बिया टेकवत म्हटल्या, “या खिशात ठेव म्हणजे…”

रशियन युद्धनौका आणि या युक्रेनच्या सैनिकांदरम्यान झालेल्या संवादामध्ये रशियन नौदलाच्या जहाजाने या बेटावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी त्यांनी उद्घोषणा करुन या सैनिकांना शरण या असं आवाहन केलं. शरण या नाहीतर उगाच रक्तपात होईल असा धमकी वजा इशारा रशियन युद्धनौकेवरुन देण्यात आला.

नक्की वाचा >> Russia vs Ukraine War: रात्री उशीरा पंतप्रधान मोदींचा पुतिन यांना फोन; फोनवर म्हणाले, “रशियाचे…”

मात्र रशियन नौदलाचं भलं मोठं जहाज समोर असताना या युक्रेनच्या सैनिकांनी शरण न येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उलट शिवीगाळ करत या जहाजाला निघून जाण्यास सांगितलं. “रशियन युद्धनौकांनी इथून निघून जावं. F*** O**” असं उत्तर या सैनिकांनी दिलं. यानंतर रशियन सैनिकांनी या बेटाचा ताबा मिळवण्यासाठी या सैनिकांची हत्या केली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या सैनिकांना युक्रेनकडून योग्य तो सन्मान दिला जाईल असं सांगतानाच त्यांना राष्ट्रीय हिरो असं म्हटलंय.

नक्की वाचा >> Ukraine War : “…तर ५ लाख किलो वजनाचं आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन भारतावर पाडायचं का?”; रशियाची अमेरिकेला धमकी

काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला असून भीतीने नागरिकांनी भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतला आहे, तर काही नागरिक पश्चिमात्य देशांमध्ये आश्रयाला जात आहेत. शुक्रवारी युक्रेनच्या पश्चिम सीमेवर  शेकडो महिला आणि मुले शेजारच्या देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी उभे असल्याचे आढळले. रशियाने मात्र किव्हवर हल्ला केल्याचे वृत्त फेटाळले आणि रशियन सैन्य नागरी भागांना लक्ष्य करणार नाही, असे स्पष्ट केले. 

नक्की वाचा >> Ukraine War: रशिया दौऱ्यात इम्रान खान यांच्या कुरापती; युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पुतिन यांना म्हणाले, “काश्मीर प्रश्न…”

प्राथमिक आकडेवारीनुसार, गुरुवारी पहाटे रशियाने आक्रमण केल्यापासून युक्रेनच्या काही सैनिकांसह १३७ जण ठार आणि ३१६ जण जखमी झाले, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष  वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी गुरुवारी उशिरा दिली. रशियाने राजधानी किव्हसह अन्य शहरांवर हवाई हल्ले केल्यामुळे युक्रेनमधील हजारो लोक सुरक्षिततेसाठी पश्चिमात्य देशांमध्ये पळून जात आहेत. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukrainian soldiers who died defending tiny island to be honoured scsg
Show comments