जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील ‘उमा भगवती’ या प्राचीन मंदिराचे मंदिराचे दरवाजे तब्बल ३४ वर्षांनंतर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामानंतर आज लोकार्पण सोहळा पार पडला आहे. यावेळी मंदिरात देवीची नवीन मूर्ती बसवण्यात आली असून ही नवीन मूर्ती राजस्थानमधून आणण्यात आली आहे. दरम्यान, उमा भगवती मंदिर तब्बल एवढ्या वर्षानंतर पुन्हा उघडल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील हे उमा भगवती मंदिर आता भाविकासांठी खुले करण्यात आले. यावेळी भाविकांना संबोधित करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी म्हटलं की, हे मंदिर पुन्हा उघडल्यानंतर मोठ्या संख्येने भाविक मंदिराला भेट देतील. विकसित जम्मू आणि काश्मीर आणि केंद्रशासित प्रदेशाच्या स्वतःच्या संस्कृतीसाठी सरकार वचनबद्ध आहे. जम्मू आणि काश्मीरला समृद्ध आणि शांत प्रदेश म्हणून विकसित करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असं नित्यानंद राय यांनी म्हटलं.

दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते उमा भगवती मंदिर भाविकासांठी खुले करण्यात आले आहे. यावेळी अनंतनागचे उपायुक्त सईद फखरुद्दीन हमीद, अनंतनागचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जीव्ही संदीप चक्रवर्ती, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि उमा भगवती ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : अतिआत्मविश्वासाचा फटका! प्रदेश भाजपच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांचे आत्मपरीक्षण

१९९० च्या दशकापूर्वी उमा भगवती मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत असत. दरम्यान विषेश म्हणजे अनंतनागमधील हे उमा भगवती मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी पाच झऱ्यांच्या मध्यभागी असलेले देवीचे दर्शन घेण्यासाठी जम्मू-काश्मीरसह विविध भागातून भक्त मोठ्या संख्येने येत असत. आता अनंतनागमधील उमा देवीचे हे प्राचीन मंदिर पुन्हा एकदा भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.

नागरिकांकडून आनंद व्यक्त

अनंतनाग जिल्ह्यातील हे उमा भगवती मंदिर भाविकासांठी खुले करण्यात आल्यानंतर येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. याबाबत एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं की, “आम्ही आमच्या पंडित बांधवांना शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहोत. ३४ वर्षांनंतर मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचा आनंद आहे.” तसेच मंदिर पुन्हा उघडल्याने काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांसह स्थानिक रहिवाशांनी जल्लोष साजरा केला. तसेच मंदिराचे उद्घाटन झाल्याबद्दल मुस्लिम बांधवांनीही आनंद व्यक्त केला. दरम्यान, मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामानंतर तेथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे मंदिर ब्रह्मा कुंड, विष्णू कुंड, रुद्र कुंड आणि शिवशक्ती कुंड या पाच धबधब्यांच्या मध्ये वसलेले असल्याचं सांगितलं जातं.