इबोलाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून आतापर्यंत या रोगाने १,५०० जणांचे बळी घेतले आहेत तर या रोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २० हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने सावधानतेचा इशारा दिला आहे.
या रोगाची एकूण तीव्रता आणि भयावहता बघता त्याचा सामना करण्यासाठी अजून ४९ कोटी डॉलर्सची गरज भासेल, असा अंदाज संघटनेने व्यक्त केला आहे.
इबोला रोगास आटोक्यात आणण्यासाठी अजून सहा ते नऊ महिन्यांचा अवधी लागू शकतो आणि तोपर्यंत या रोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २० हजारांच्या पुढे जाऊ शकते, अशी भीती आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन कार्यक्रमांचे प्रमुख ब्रुस ऐलीवर्ड यांनी जीनिव्हा व्यक्त केली. ‘जागतिक आरोग्य सुरक्षा’ या विषयावर ते बोलत होते. २६ ऑगस्टपर्यंत या रोगाने १,५५२ लोकांचा मृत्यू झाल्याच्या माहितीस ऐलीवर्ड यांनी दुजोरा दिला. लायबेरियात या रोगाने मरण पावलेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे, ६९४ एवढी असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader