सिक्कीम राज्याने भारताची मान जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा अभिमानाने उंच केली आहे. संयुक्त राष्ट्रांनी सिक्कीम राज्याला जगातलं पहिलं Organic State हा बहुमान प्रदान केला आहे. राज्यभरात केल्या जाणाऱ्या शेतीमध्ये सेंद्रीय पद्धतीचा अवलंब करुन पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक पाऊल उचलल्याने सिक्कीम राज्याला हा पुरस्कार दिला गेला आहे.  25 विविध देशांमधून 51 राज्यांनी या पुरस्कारासाठी अर्ज केला होता, ज्यामध्ये सिक्कीमने बाजी मारली आहे.

ब्राझील, डेन्मार्क आणि इक्वेडोर यांना रौप्य पदकाचा मान मिळाला आहे. सिक्कीम राज्याने अवलंबलेल्या धोरणामुळे राज्यातील तब्बल 66 हजार शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं असून, राज्याच्या भेट देणाऱ्या पर्यटकांमध्येही वाढ झालेली आहे. इतर देशांसाठी सिक्कीमने घालून दिलेला पायंडा हा आदर्शवत असल्याचंही संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. 2016 साली सिक्कीमने शेतीमधून रासायनिक खतं आणि किटकनाशकं यांचा वापर पूर्णपणे बंद केला. 15 ऑक्टोबररोजी रोम मध्ये झालेल्या सोहळ्यात सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी हा पुरस्कार स्विकारला.

Image Of Priyanka Gandhi And PM Modi
Dollar vs Rupee : “रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले, पंतप्रधानांनी जनतेला उत्तर द्यावे”, प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
wardha deoli Shantanu raut
जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला
indonesia free meal programme
भारताकडून ‘या’ देशाने घेतली प्रेरणा; नऊ कोटीहून अधिक मुलांना आणि महिलांना कसे मिळणार मोफत अन्न?
loksatta readers feedback
लोकमानस: साम्राज्य उभे करण्यासाठी निधीचा वापर
Image Of Gautam Adani And Narendra Modi
Modi-Adani : “मोदींनी प्रत्येक नियम मोडत अदाणींना मोठे केले, पण आता…” अमेरिकेतील खटल्यांवरून माजी केंद्रीय मंत्र्याची टीका
Indian rupee fall by 85 79 rupees
रुपयाची झड ८५.७९ पर्यंत
Modi Govt faces criticism for handling economic crisis
“नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या जुमलांपेक्षा…” देशाच्या आर्थिक स्थितीवरून खरगेंची पंतप्रधान मोदींवर टीका
Story img Loader