हमासने २४ तासांची मानवतावादी शस्त्रसंधी मान्य केल्यानंतर आता गाझा पट्टय़ात शांतता असून, किनारपट्टीत इस्रायलच्या हल्ल्यांची संख्या कमी झाली आहे, हमासनेही रॉकेटचा मारा कमी केला आहे. अमेरिका व संयुक्त राष्ट्रांनी या २० दिवसांच्या संघर्षांत कायमची शस्त्रसंधी व्हावी अशी आशा व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाची बैठक रविवारी रात्री उशिरा झाली. त्यात इस्रायल व पॅलेस्टाइन यांच्यात विनाअट व ताबडतोब शस्त्रसंधी करण्याचे आवाहन करण्यात आले व ईदनिमित्त त्याचे पालन तर करावेच, शिवाय नंतरही एकमेकांवर हल्ले करू नयेत असे सुचवण्यात आले. आतापर्यंतच्या संघर्षांत १०३० पॅलेस्टिनी व ४६ इस्रायली ठार झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने ईद व त्यानंतरही शस्त्रसंधी पाळण्याच्या निवेदनास पाठिंबा दिला. सुरक्षा मंडळाने सध्या अध्यक्ष असलेल्या रवांडा या देशाने स्थायी शस्त्रसंधीचे आश्वासन दिले असून, इजिप्तच्या शांतता तोडग्याच्या आधारे त्यांनी हे आवाहन केले होते. गाझा सीमेवरील चौथ्या खुल्या करण्याचे आवाहनही करण्यात आले असून, गाझा पट्टय़ात अनेक रात्रींपासून काल प्रथमच शांतता होती. हमास व इस्रायलने तात्पुरती शस्त्रसंधी मान्य केल्याचा तो परिणाम होता.
दरम्यान, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने  दिलेल्या माहितीनुसार ३० पॅलेस्टिनी ठार झाले व काही कुटुंबांतील सदस्य बेपत्ता आहेत. इस्रायलच्या लष्कराने सोमवारी सकाळी हमासने रॉकेट हल्ला केल्याचे सांगितले ते दक्षिण इस्रायलमध्ये पडले. इस्रायलच्या प्रवक्त्याने सांगितले, की आम्ही कुठलेही हवाई हल्ले गाझा पट्टय़ात केलेले नाहीत. गाझामध्ये अजूनही लष्कर असून, ज्या बोगद्यांमधून पॅलेस्टिनी लोक इस्रायलमध्ये घुसतात त्या बोगद्यांना लक्ष्य केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा