Israel – Palestine News in Marathi: गेल्या आठवड्याभरापासून इस्रायल व हमास यांच्यामध्ये भीषण युद्ध पेटलं आहे. गेल्या शनिवारी गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या भूमीवर रॉकेट हल्ला चढवला. त्यापाठोपाठ हमासचे दहशतवादी मोठ्या संख्येनं इस्रायली भूमीत शिरले व त्यांनी सामान्य नागरिकांची कत्तल सुरू केली. अनेक महिलांचं अपहरण करून त्यांना ओलीस ठेवलं. हमासच्या या अत्याचारांना इस्रायलकडूनही सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. आता इस्रायलनं प्रतिहल्ला अधिक तीव्र केला आहे. दोन्ही बाजूच्या सामान्य नागरिकांच्या दयनीय अवस्थेबाबत जगभरात चिंता व्यक्त होत असतानाच संयुक्त राष्ट्रांच्या गाझा पट्टीतील एका कर्मचाऱ्याचा भावनिक संदेश सध्या व्हायरल होत आहे.

इस्रायल-हमास संघर्ष चिघळला!

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलयनं हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली. नुकचाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझा आणि आसपासच्या नागरिकांना दक्षिण गाझा भागात स्थलांतर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गाझा शहर परिसरात प्रामुख्याने हमासचे दहशतवादी आश्रयाला असल्यामुळे हा भाग बेचिराख करण्याची योजान इस्रायल लष्करानं आखली आहे. या पार्श्वभूमीवर आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून इस्रायलला सबुरीचा सल्ला दिला जात आहे.

Loksatta lalkilla BJP Congress video viral Rahul Gandhi Amit Shah
लालकिल्ला : शहांची कोंडी आणि भाजप सैरावैरा!
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Dhananjay munde
Dhananjay Munde : मंत्रिपद मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंची पोस्ट चर्चेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याना उद्देशून म्हणाले, “मी..”
uddhav Thackeray Bhaskar Jadhav
बिनखात्याच्या ४१ मंत्र्यांचा अनोखा विक्रम, भास्कर जाधव म्हणाले…
buldhana protest against home minister amit shah
अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…
opposition angry over Amit Shahs controversial statement about dr babasaheb ambedkar
‘बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान’, अमित शहांच्या वादग्रस्त मुद्यावर विरोधक संतप्त
MVA Andolan
MVA Agitation : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन; जयंत पाटील म्हणाले,”षडयंत्र…”
Sanjay Raut on Uddhav Devendra meeting (1)
“तू राहशील किंवा मी”, फडणवीसांना आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन; राऊत म्हणाले, “तोफा थंडावल्या”

दरम्यान, एकीकडे युद्ध दिवसेंदिवस अधिकाधिक चिघळत असताना दुसरीकडे गाझा पट्टीतून इस्रायलच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या भीषण स्थितीचं वास्तव समोर येऊ लागलं आहे. गाझा पट्टीत हवाई हल्ल्यांनतर आता इस्रायलकडून जमिनीवरून गाझा पट्टीत हल्ले चढवले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या गाझा पट्टीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा भावनिक संदेश व्हायरल होत आहे. यूएनच्या अधिकृत एक्स हँडलवर हा संदेश पोस्ट करण्यात आला आहे. तसेच, युद्धशांतीचं आवाहनही करण्यात आलं आहे.

Israel – Hamas War : अमेरिकेकडून इस्रायलला तंबी, गाझा पट्टीबाबत दिला महत्त्वाचा इशारा…

काय आहे या संदेशामध्ये?

हा एक व्हॉट्सअॅप संदेश असल्याचं यूएनच्या पोस्टवरून दिसून येत आहे. पोस्टमध्ये पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव Helen/Gaza असं नमूद करण्यात आलं आहे. “तिथे परिस्थिती कशी आहे? तुम्ही सुरक्षित आहात का?” असा प्रश्न केला असता त्यावर उत्तरादाखल हेलन यांनी गाझा पट्टीतील भीषण स्थिती सांगितली आहे.

“मरण पावलेलेही आमच्यासोबतच आहेत आणि जे जिवंत आहेत ते…”

“आम्ही वारंवार स्वत:ला आणि एकमेकांना सांगत असतो की सगळ्यांनी एकत्र एका खोलीत राहायला हवं. जर आपण या हल्ल्यात मारले गेलो, तर एकत्रच मरुयात. पण खरं सांगायचं तर आमच्यापैकी कुणीच व्यवस्थित नाही. जे मरण पावलेत, तेही आमच्यासोबतच आहेत आणि उरलेले आम्ही जे जिवंत आहोत तेही खरंतर मेलेलोच आहोत”, असं भावनिक उत्तर या संदेशात देण्यात आलं आहे.

“आमची ईश्वराकडे प्रार्थना आहे की त्यानं सगळ्यांचं रक्षण करावं. देवाच्या कृपेनं आम्ही आज त्या भीषण कोंडमाऱ्यातून काही काळासाठी बाहेर आलो. आम्हाला थोड्याफार जखमा झाल्या आहेत. पण इथे त्यांनी आख्खा चौकच बॉम्बफेक करून उद्ध्वस्त केला आहे. इथे प्रेतांचा खच पडला आहे”, असंही या संदेशात पुढे नमूद केलं आहे.

“मरण यायचंच असेल, तर ते लवकर येऊ दे”

“हे ईश्वरा, कृपया आमची मदत कर. जर आमच्या भाळी मरणच लिहिलं असेल, तर कृपा करून ते मरण लवकर येऊ दे”, असं निर्वाणीचं मागणं या संदेशात करण्यात आलं आहे.

Story img Loader