सीरियात परस्परांविरोधात लढणाऱ्या बंडखोर गटांना संयुक्त राष्ट्रांचे मध्यस्थ लखदार ब्राहिमी हे भेट भेटणार असून संबंधित गट समोरासमोर बसून वाटाघाटी करण्यास तयार आहेत का, याचा अदमास ब्राहिमी घेतील.गुरुवारी झालेल्या शांतता परिषदेच्या पहिल्या उभयपक्षी कटू वादविवाद झाल्यानंतर यासंबंधी निर्णय घेण्यात आला. सीरियाचे अध्यक्ष बशर अल् यांच्या राजवटीतील प्रतिनिधी व विरोधकांसमवेत ब्राहिमी यांची चर्चा होईल. जिनिव्हा येथे यासंबंधी शुक्रवारी चर्चा होणार आहे. सीरियातील लढय़ावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रपुरस्कृत परिषदेस येथे बुधवारी प्रारंभ झाला. मात्र या परिषदेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावांवर उभय बाजूंनी असहमती दर्शविण्यात आली. त्यामुळेच ब्राहिमी यांनी आता उभय पक्षांसमवेत चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader