अशांत कांगोत गुरुवारी काही अज्ञात बंदूकधारी तसेच ‘एम २३’ संघटनेतील अतिरेक्यांमध्ये सुरू झालेल्या चकमकीत हस्तक्षेप करीत संयुक्त राष्ट्र शांतिसेनेने केलेल्या गोळीबारात चार अतिरेकी ठार झाले.
कांगोतील लोकशाही सरकारविरोधात गेली चार वर्षे ‘एम२३’ ही संघटना हिंसक कारवाया करीत असून गेल्या दोन वर्षांत त्यांचा जोर कमालीचा वाढला आहे. या संघटनेत आधीच्या राजवटीतील लष्करातील बरेचसे सैनिकही आहेत. कांगोच्या पूर्वेकडील प्रांतात या संघटनेचा प्रभाव आहे. उत्तर किवु प्रांताच्या गोमा या राजधानीच्या शहरातील या संघटनेच्या तळावर गुरुवारी ३० अज्ञात हल्लेखोरांनी मारा सुरू केल्यानंतर ही चकमक सुरू झाली होती. हल्लेखोरांकडून शांतिसेनेच्या तळावरही गोळीबार झाल्याने शांतिसैनिकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चार जण ठार झाले.

Story img Loader