रुग्णवाहिकेसाठी पैसे नसल्याने पाच महिन्यांच्या मुलाचा मृतदेह वडिलांनी बॅगेत ठेवून २०० किमी प्रवास केला. पश्चिम बंगालमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकरणाती भाजपाचे विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसच्या स्वास्थ साथी वीमा योजेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. ज्या मुलाचा मृत्यू झाला त्याच्या वडिलांचं नाव अशीम देबशर्मा असं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की माझ्या पाच महिन्यांच्या बाळाचा मृत्यू रविवारी रात्री झाला. त्यानंतर अँब्युलन्ससाठी ८ हजार रुपये मागितले गेले. ते माझ्याकडे नव्हते. त्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं.

अशीम देबशर्मा यांनी काय म्हटलं आहे?

“सिलीगुडी नॉर्थ बंगाल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या ठिकाणी माझ्या पाच महिन्यांच्या मुलावर उपचार सुरु होते आहे. रविवारी रात्री उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुलगा वाचावा म्हणून मी पूर्ण केले. त्याच्या उपचारांवर १६ हजार रुपये खर्च झाले. मात्र माझा मुलगा वाचू शकला नाही. त्यानंतर माझ्या मुलाला कालियागंज या ठिकाणी घेऊन जाण्याचे म्हणजेच माझं घर जिथे आहे तिथे घेऊन जाण्याचे अँब्युलन्स चालकाने ८ हजार रुपये मागितले. माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. काय करावं मला सुचत नव्हतं. शेवटी मी बॅगेत माझ्या मुलाचा मृतदेह ठेवला आणि २०० किमी प्रवास केला.”

life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Atul Subhash Suicide
Atul Subhash Suicide: गुन्हे मागे घेण्यासाठी ३ कोटी, तर मुलाला भेटू देण्यासाठी ३० लाख रुपयांची पत्नीकडून मागणी; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी भावाचा खुलासा
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
Robotic assisted Surgery at Fortis Hospital
हृदयविकाराच्या रुग्णावर केली रोबोटिक गॉलब्लॅडर शस्त्रक्रिया!
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

देबशर्मा यांनी म्हटलं आहे अँब्युलन्सचे पैसे भरण्याची ऐपत नव्हती. त्यामुळे मी मुलाचा मृतदेह बॅगेत ठेवला. त्यानंतर दार्जिलिंगच्या सिलिगुडीपासून उत्तर दिनाजपूरच्या कालियागंज पर्यंत २०० किमीचा प्रवास बसने केला. या प्रवासात माझ्या बॅगेत काय आहे याचा प्रवाशांना मी जराही अंदाज येऊ दिला नाही. कारण मला ही भीती वाटत होती की जर प्रवाशांना ही बाब समजली तर ते मला बसमधून उतरवून देतील. त्यांनी हेदेखील सांगितलं आहे की अँब्युलन्सच्या चालकाने हे सांगितलं की १०२ ही सेवा रुग्णांसाठी आहे मृतदेह नेण्यासाठी नाही. या घटनेनंतर आता राजकारण तापलं आहे.

तृणमूसचे राज्यसभा सदस्य शांतनू सेन यांनी लहान मुलाच्या मृत्यूचं राजकारण भाजपाकडून केलं जातं आहे असा आरोव केला आहे. या घटनेबाबत कुठलंही भाष्य करणं योग्य नाही. जी घटना घडली ती घडायला नको होती असंही सेन यांनी म्हटलं आहे. द प्रिंटने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

Story img Loader