नवी दिल्ली : कर्नाटकमधील भाजपच्या उमेदवारांच्या निवडीसाठी दिल्लीत सलग चार दिवस बैठकांचे सत्र सुरू असून सोमवारीदेखील अनिश्चितता कायम होती. उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर होणे अपेक्षित होते, मात्र त्यासाठी आता मंगळवार किंवा बुधवार उजाडेल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय निवड समितीच्या तीन तासांच्या बैठकीत सर्व उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब न झाल्याने सोमवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली. शहा अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर निघून गेल्यानंतर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी चर्चेची दुसरी फेरी झाली. तरीही संभाव्य उमेदवारांबाबत नेत्यांच्या मनात किंतू राहिल्याने पुन्हा चर्चा होऊन कदाचित मंगळवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकेल. ‘काही उमेदवारांबाबत मतदारसंघातून अधिक माहिती मागितली असून त्या आधारावर त्यांचे पुन्हा मूल्यमापन केले जाईल आणि नव्या उमेदवारांवर चर्चा करावी लागेल,’ असे बोम्मई यांनी पत्रकारांना सांगितले.

mahesh gaikwad
कल्याण : फरार मारेकऱ्यांना पकडण्यासाठी महेश गायकवाड यांचे २५ हजार रूपयांचे बक्षिस
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan news in marathi
साहित्याच्या मांडवात राजकारण्यांची ‘सरबराई’!
devendra fadnavis likely visit davos
दावोसमध्ये पुढील आठवड्यात जागतिक आर्थिक परिषद; सात लाख कोटींचे करार अपेक्षित
Why Shiv Sainik Dug Wankhede Pitch in 1991 by Orders of Balasaheb Thackrey Before India vs Pakistan Match
Wankhede Stadium: बाळासाहेबांचा इशारा अन् शिवसैनिकांनी वानखेडेचं पिच खोदलं, पाकिस्तान बरोबरच्या ‘त्या’ सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं?
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
shivsena marathi news
पुण्यात भाजपच्या खेळीने शिवसेनेच्या दोन्ही गटांत अस्वस्थता
Parliamentary committee meeting opposition aggressive on one nation one election issue
संसदीय समितीची वादळी बैठक ,‘एक देश एक निवडणूक’ मुद्द्यावर विरोधक आक्रमक

प्रत्येक मतदारसंघात तीन उमेदवारांच्या पर्यायांची यादी प्रदेश भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे दिली होती. त्यावर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी सलग दोन दिवस पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चामध्ये बराच खल झालेला होता. त्यानंतर मोदींसमोर उमेदवार निश्चितीसाठी फायदा-तोटय़ाचे गणित मांडले गेले. या बैठकांमध्ये बोम्मई, येडियुरप्पा, अमित शहा, जे. पी. नड्डा, निवडणूक प्रभारी धर्मेद्र प्रधान, सहप्रभारी मनसुख मांडाविया, प्रभारी अरुण सिंह, बी. एल. संतोष, सी. टी. रवी, प्रल्हाद जोशी, प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कातील तसेच अन्य प्रदेश भाजपचे नेते उपस्थित होते.

बोम्मई पारंपरिक शिगावमधून

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे पारंपरिक शिगाव मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. २००८ पासून तीनवेळा या मतदारसंघातून बोम्मई विधानसभेचे सदस्य बनले आहेत. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची मागणीही मान्य झाल्याचे सांगितले जाते. येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांना शिकारीपुरा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सिद्धरामय्या यांच्या विरोधात वरुणा मतदारसंघातून विजयेंद्र यांना उमेदवारी देण्याचा विचार केंद्रीय नेतृत्वाने केला होता. मात्र, येडियुरप्पा यांनी हा विचार हाणून पाडला असून आपल्या बालेकिल्ल्यातून विजयेंद्र यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यावर येडियुरप्पा ठाम राहिल्याचे दिसते.

बंडखोरीची भीती?

भाजपच्या मुख्यालयात झालेल्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत १७०-१८० उमेदवार निश्चित केले असले तरी, मोदी-शहांनी काही उमेदवारांच्या निवडीबाबत शहानिशा करण्याची सूचना केल्यामुळे नड्डांना आवश्यक माहिती दिली जात असल्याचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितले. काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी वाढू शकते. एक तृतियांश आमदारांना डच्चू देण्याचा गुजरात फॉम्र्युला न वापरता शक्य त्या मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. पण, अगदीच खराब कामगिरी करणाऱ्या काही आमदारांना उमेदवारी नाकारली जाऊ शकते. बंडखोरीच्या भीतीने भाजपने उमेदवारांच्या निवडीबाबत आस्ते कदम धोरण अवलंबले आहे.

कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून मुख्यमंत्रीपदासाठी खरगेंचे नाव

चिकमंगळुरु: कर्नाटकमध्ये काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून अनेक दावेदार आहेत. प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार तसेच माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांची नावे यात आघाडीवर आहेत. यातच शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पुढे केले आहे. याद्वारे सिद्धरामैय्या यांना याद्वारे शह दिल्याचे मानले जात आहे. खरगे मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यास आवडेल असे वक्तव्य शिवकुमार यांनी केले आहे. खरगे आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. ते माझे नेते आहेत असे शिवकुमार यांनी नमूद केले. अर्थात पक्षाचा निर्णय बंधनकारक राहील अशी पुस्ती त्यांनी जोडली.

Story img Loader