गोवा सरकारमधील तीन मंत्री आणि तीन आमदार फुटबॉल विश्वचषक पाहण्यासाठी आता स्वखर्चाने ब्राझीलला जाणार आहेत. अभ्यास दौऱयासाठी त्यांना ब्राझीलला पाठविण्यात येत असल्याचे भाजपने म्हटले आहे.
फोटो गॅलरी: दस का दम..
सुरूवातीला सरकारी खर्चाने हे सहा आमदार ब्राझील दौरा करणार होते परंतु, सरकारी तिजोरीतून ब्राझील दौऱयासाठीचा खर्च होणार असल्याचे समजताच गोवा सरकारच्या निर्णयावर चहुबाजूंनी टीका होण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे गोवा सरकारने आपल्या निर्णयात बदल करत हे आमदार आता स्वखर्चाने ब्राझीलला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
फोटो गॅलरी- फिफाचा रंगारंग सोहळा..
ब्राझील दौऱयाला जाणाऱया आमदारांची बैठक झाली असून राज्य सरकारचा निधी न वापरता आता स्वखर्चाने ब्राझीलला जाण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे गोव्याचे मंत्री फर्टाडो यांनी सांगितले.
या दौऱयासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून ८९ लाख रुपये खर्च होणार होते. यावर विरोधी पक्ष काँग्रेसने टीकेची झोड उठवत गोवा सरकारकडून वायफळ खर्च होत असल्याचे म्हटले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यात हस्तक्षेप करावा आणि हे थांबवावे अशी मागणी केली होती.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मात्र, या अभ्यास दौऱयाचे समर्थन केले होते. फुटबॉल हा गोव्यातील प्रमुख खेळ आहे आणि २०१७ साली देशात होणाऱया १७ वर्षाखालील फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजनासाठी हा दौरा उपयोगी ठरणार असल्याचे पर्रिकर यांनी म्हटले आहे.
तसेच गोव्यात सुरू असलेल्या ‘एक्सप्रेस टेक्नॉलॉजी सभा’ कार्यक्रमात मनोहर पर्रिकर यांनी माध्यमांनी समाजात राजकारण्यांची नकारात्मक प्रतिमा निर्माण केली आहे. हेच माध्यमांचे सर्वात मोठे अपयश आहे, असे मत व्यक्त केले.
गोव्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर, उर्जामंत्री मिलिंद नाईक आणि मत्स्योद्योग मंत्री ऍव्हर्टनो फर्टाडो हे मंत्री ब्राझीलला जाणार आहेत. त्यांच्यासोबत इतर तीन आमदारांचाही समावेश आहे.
‘ब्रँड मेस्सी’ तेजीत!