नवी दिल्ली : सत्तेत आल्यास एका वर्षासाठी दिल्लीतील सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने रविवारी दिले. विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसने केलेली ही तिसरी घोषणा आहे.‘युवा उडान योजने’अंतर्गत ही आर्थिक मदत दिली जाणार असून ती मोफत नसल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट पत्रपरिषदेत म्हणाले.जे तरुण कंपनी, कारखाना किंवा संस्थेत आपले कौशल्य दाखवू शकतात त्यांना आर्थिक सहाय देणार असल्याचे व त्यांना या कंपन्यांच्या माध्यमातून पैसे मिळतील, असे ते म्हणाले. यासोबतच घरात बसून पैसे मिळतील, अशी ही योजना नसल्याचेदेखील त्यांनी भाजपचे नाव न घेता टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘महाकुंभ’ आज पासून ; पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान; ४५ दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, काँग्रेसने आपला प्रचार दोन मुख्य पैलूंवर केंद्रित केला आहे. पक्षाने तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीतील कामगिरीवर प्रकाश टाकला असून सत्तेत आल्यानंतर सुरू करण्यात येणाऱ्या नवीन कल्याणकारी योजनांचाही उल्लेख केला आहे. दीक्षित यांनी केलेल्या विकासकामांमुळेच राष्ट्रीय राजधानी जागतिक दर्जाची झाली, असे नवी दिल्ली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unemployed will get rs 8500 per month if congress get power in delhi zws