भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदींच्या गुजरातमधील गांधीनगर ऐवजी भोपाळमधून लोकसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडे लालकृष्ण अडवाणी यांनी भोपाळमधून लोकसभा निडवणूक लढविण्यासाठीची इच्छा व्यक्त केल्याचे सुत्रांनी सांगितले. अर्थात, पक्षातील ज्येष्ठ नेता असल्यामुळे इच्छुक जागी तिकीट मिळण्याचा दावा किंवा अधिकार त्यांना असू शकतो. परंतु, अडवाणी ज्येष्ठ नेते असल्यामुळे सुरक्षित जागेवर उमेदवारी जाहीर करण्याची पक्षाची भूमिका आहे.
अडवाणी यांना गांधीनगर मतदारसंघातून लोकसभा उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. यावर अडवाणी यांनी गांधीनगरमधून निवडणूक लढविण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याचे म्हटले, पण भोपाळमधून निवडणूक लढविणे अडवाणींसाठी सुरक्षित राहील, असे सुत्रांचे म्हणणे आहे.
उमेदवारी जाहीर करण्याचा अंतिम निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळाचा आहे. परंतु, अडवाणींनी बैठकीला मारलेली दांडी हे त्यांच्या नाराजीचे कारण मानले जात आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा