संसदेच्या विधि व न्याय, तक्रार निवारण आणि कार्मिक विषयक स्थायी समितीची बैठक सोमवारी झाली. यावेळी विधी आयोगाच्या वतीने समान नागरी संहितेसंदर्भातील सादरीकरण करण्यात आलं. या बैठकीनंतर भाजपाचे राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. समान नागरी कायदा लागू करायचा आहे. यात कोणतीही शंका नाही, असं महेश जेठमलानी यांनी सांगितलं.
महेश जेठमलानी म्हणाले, “संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत थोडा वाद-विवाद झाला. पण, कोणीही समान नागरी कायद्याला विरोधा दर्शवला नाही. निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून कायद्याची अंमलबजावणी करू नये. प्रत्येक राज्यांशी चर्चा करूनच हा कायदा अंमलात आणला पाहिजे, असं मत काहींनी व्यक्त केलं.”
हेही वाचा : विरोधकांच्या महाआघाडीची बैठक होणारच!, ‘राष्ट्रवादी’च्या फुटीनंतर खरगे-राहुल गांधी यांची शरद पवारांशी चर्चा
“समान नागरी कायदा हा जनतेसाठी महत्वाचा आहे. उत्तराधिकारी, वारसा, लग्न आणि घटस्फोट यांसारख्या मुद्द्यांवर आपण एकमत घडवून आणू शकत नाही. तर, भारत हा वैविध्यपूर्ण देश आहे, असं म्हणण्याचा अर्थ काय?” असा सवाल महेश जेठमलाही यांनी उपस्थित केला.