कुठला ग्रह वसाहतयोग्य आहे, कुठला नाही इथपर्यंतच्या संशोधनात आपण सध्या अडकलो असलो तरी एखादा वसाहतयोग्य नसलेला ग्रह गोल्डीलॉक विभागात नेऊन त्याला वसाहतयोग्य बनवता येणे अवघड नाही, असे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे.
गोल्डीलॉक झोन हा सौरमालेतील असा भाग आहे जिथे अवकाशीय ग्रहगोलांवर वसाहतयोग्य स्थिती निर्माण करता येऊ शकते.
अमेरिकेचे खगोलभौतिकशास्त्रज्ञ नील डीग्रासी टायसन यांना एका पॉडकास्टच्या वेळी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी अशी शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले.
जर वैज्ञानिक आता उल्कापाषाण, लघुग्रह यांची दिशा नियंत्रित करण्याबाबत सक्षमता व्यक्त करीत आहेत तर तीच तंत्रे वापरून वसाहतयोग्य नसलेले ग्रह सौरमालेतील वसाहतयोग्य स्थिती निर्माण करणाऱ्या भागात नेणे शक्य आहे काय, असा प्रश्न एका श्रोत्याने विचारला होता त्यावर टायसन यांनी वरील स्पष्टीकरण केले आहे.
टायसन यांनी सांगितले की, समजा आपल्याला एखादा ग्रह वसाहतयोग्य स्थिती निर्माण होऊ शकेल अशा अवस्थेत आणायचा आहे तर तो गोल्डीलॉक झोनमध्ये पाठवता येऊ शकतो. गोल्डीलॉक झोन हा सौरमालेतील असा भाग आहे जिथे सूर्यापासून मिळणारी उष्णता ही द्रव पाण्याच्या अस्तित्वास अनुकूल व वाफेच्या रूपातील किंवा गोठलेल्या रूपातील पाण्याला प्रतिकूल असते. सैद्धांतिकदृष्टय़ा अशाप्रकारे ग्रह हलवणे हे १०० टक्के शक्य आहे. जेव्हा आपण लघुग्रह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू शकू तेव्हा पुढच्या पायरीवर आपण नेहमीचे ग्रहही हलवू शकू.
मोठय़ा प्रमाणात ऊर्जेची गरज : नासाच्या ऑरबायटल डेब्री रीसर्च संस्थेचे निवृत्त वैज्ञानिक डोनाल्ड केसलर यांनी सांगितले की, या कल्पनेशी आपण सहमत आहोत व ते पूर्णपणे शक्य आहे. असे असले तरी हे ग्रह गोल्डीलॉक झोनमध्ये ढकलण्यासाठी मोठय़ा प्रमाणात ऊर्जा लागेल. पृथ्वीच्या कक्षेत येणाऱ्या एखाद्या लघुग्रहाची दिशा बदलणे व एखादा ग्रह पूर्णपणे एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे यात खूप फरक आहे, असे मतही केसलर यांनी व्यक्त केले.
वसाहतयोग्य नसलेल्या ग्रहावरही वसाहत शक्य!
कुठला ग्रह वसाहतयोग्य आहे, कुठला नाही इथपर्यंतच्या संशोधनात आपण सध्या अडकलो असलो तरी एखादा वसाहतयोग्य नसलेला ग्रह गोल्डीलॉक विभागात नेऊन त्याला वसाहतयोग्य बनवता येणे अवघड नाही, असे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे.

First published on: 26-06-2013 at 01:33 IST
TOPICSग्रह
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uninhabitable planets can be moved into goldilocks zone