India Budget 2023-24 Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा आज सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच २०२३-२४ चा आर्थिक विकासाचा वेग ६ ते ६.८ टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे बाजारात काहीसं चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दुसरीकडे जागतिक पटलावर या वर्षी आर्थिक मंदीची जोरदार चर्चा असताना गेल्या काही दिवसांपासून देशाच्या आर्थिक आणि राजकीय वर्तुळात आजचा अर्थसंकल्प चर्चेचा विषय ठरला होता.
या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने करदात्यांसाठी करपात्र रकमेत सूट देण्याची मोठी घोषणा केली आहे.
Budget 2023 Updates, Nirmala Sitharaman Speech: केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ साठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणाचे प्रत्येक अपडेट
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अमृतकाळातील सर्वजनहिताय या संकल्पनेवर आधारित आहे. समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे. विशेषत: पुढच्या २५ वर्षांत आपण म्हणत असलेल्या विकसित भारताकडे जाण्याचा रस्ता अर्थसंकल्पाने स्पष्टपणे दाखवलाय – देवेंद्र फडणवीस
अर्थसंकल्पामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत. पण या अर्थसंकल्पात मनरेगा योजनेचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. शिवाय ग्रामीण भागातील गरीब मजूर, रोजगार आणि महागाईबाबत यात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. काही मूलभूत प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहिले आहेत – काँग्रेस खासदार शशी थरूर
There are some good things in #UnionBudget2023 but there was no mention of MNREGA, poor rural labour, employment & inflation. Some fundamental questions remained to be answered: Congress MP Shashi Tharoor pic.twitter.com/bgRdzhgj18
— ANI (@ANI) February 1, 2023
Budget 2023: नव्या करश्रेणीत मोठे बदल
नव्या करश्रेणीत २.५ लाखांपासून स्लॅब सुरू झाले होते. आता स्लॅब्जची संख्या ५ पर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यानुसार..
३ लाखांपर्यंत – कोणताही कर नाही
३ ते ६ लाख – ५ टक्के
६ ते ९ लाख – १० टक्के
९ ते १२ लाख – १५ टक्के
१२ ते १५ लाख – २० टक्के
१५ लाखांहून जास्त – ३० टक्के
अर्थसंकल्प म्हणजे भविष्यात आपण काय करणार आहोत हे सांगणारं वास्तव आहे. आर्थिक मंदीशी भारत कसा लढेल, ही निर्मल आशाही धुळीस मिळाली आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य भारतीयांना काही मिळेल असं काही चित्र नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी अर्थसंकल्प बघतोय. अर्थसंकल्प म्हणजे फक्त फुगवलेले आकडे असतात. ज्या प्रकारे जीडीपी मॅनेज करतायत, ते पाहता या फुगवलेल्या फुग्यांमध्ये काहीच नाही हे दिसतंय – जितेंद्र आव्हाड</p>
विरोधकांकडून बजेटबद्दल चांगलं बोलण्याची अपेक्षा नव्हती. अर्थमंत्र्यांनी सगळ्यात मोठा दिलासा कररचनेत वाढवण्यात आलेल्या स्लॅबच्या रुपाने मिळाला आहे. हे वाचणारे पैसे बाजारात गुंतवणुकीच्या माध्यमातून येतील. यातून देशाचा आर्थिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला
आहे – सुजय विखे पाटील
अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्सची ११७२ अंशांनी उसळी, थेट ६० हजार ७२२ वर पोहोचला!
To improve social-economic condition of the Particularly Tribal Groups, PMPBTG Development mission will be launched, to saturate PBTG habitations with basic facilities. Rs 15,000 cr to be made available to implement scheme in next 3 years: FM Nirmala Sitharaman
— ANI (@ANI) February 1, 2023
समाजिकदृष्ट्या मागास आदिवासी जमातींच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी PMPBTG Development Mission ची घोषणा. पुढच्या तीन वर्षांत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी १५ हजार कोटींची तरतूद!

पॅनकार्डचा वापर सरकारी कार्यालयांमध्ये कॉमन आयडी अर्थात एकल ओळखपत्र म्हणून केला जाणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
PAN will be used for common identifier for all digital systems of specified government agencies: FM Sitharaman
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2023
निर्मला सीतारमण यांनी पायाभूत सुविधांना सर्वाधिक प्राधान्य दिलं आहे. रस्ते बांधणीमध्ये आम्ही केलेला निर्धार त्यामुळे पूर्ण करण्यास मदत होणार आहे – नितीन गडकरी
मुंबईकरांच्या पदरी घोर निराशा झाली आहे. मुंबईच्या विकासासाठी मोठं पॅकेज मिळेल असं वाटलं होतं. पण मुंबईकरांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम अर्थसंकल्पात झालं आहे – विनायक राऊत, ठाकरे गटाचे खासदार
देशात फार मोठ्या उद्योगपतींना मोठी सूट मिळाली आहे. रेल्वेमधली खासगी गुंतवणूक म्हणजे नेमकं काय? याचे सूतोवाच होणं गरजेचं होतं. काही चांगल्या गोष्टी आहेतच. पण याआधी झालेल्या घोषणांचं नेमकं काय झालं? याचा उल्लेख असता, तर चांगलं झालं असतं – अमोल कोल्हे</p>
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. जाहीर केलेल्या योजनांचं फलित काय आहे? हे या अर्थसंकल्पात दिसत नाही – सुनील तटकरे
करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स अर्थात करपरतावा सादर केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्याचा कालावधी ९३ दिवसांवरून थेट १६ दिवसांवर आला आहे.
Average processing time for income tax returns reduced from 93 days to 16 days. The government intends to roll out next-gen common IT Return forms and strengthen grievance redressal mechanism: FM Sitharaman
— ANI (@ANI) February 1, 2023
देशातील भारतीयांचं वार्षिक सरासरी उत्पन्न आता १ लाख ९७ हजार रुपयांपर्यं वाढल्याचं अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलं आहे.
Per capita income has increased to Rs 1.97 lakh: FM Sitharaman

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये जॉइंट अकाऊंट होल्डर्ससाठी असणाऱ्या मासिक उत्पन्न योजनेची मर्यादा ९ लाखांवरून १५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Monthly Income Scheme limit doubled to Rs 9 lakh and Rs 15 lakh for joint accounts

Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या साडीची चर्चा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज संसदेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
Budget 2023-24: ‘या’ टिप्सच्या मदतीने एका क्लिकवर पाहा ‘पेपरलेस बजेट’
१ फेब्रुवारी २०२३ ला सादर होणारे वर्ष २०२३-२४ चे वार्षिक अर्थसंकल्प तुम्हाला अगदी सहज आपल्या मोबाईलवरही पाहता येईल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प २०२३-२४ जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स ९८० अंकांनी वधारला आहे.
Sensex up over 980 points, currently trading at 60,534; Nifty at 17,919
— ANI (@ANI) February 1, 2023
Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२३-२४ साठीचा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना चुकल्या आणि संसदेत एकच हशा पिकला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनाही हसू अनावर झालं. मात्र, आपली चूक झाल्याचं निर्मला सीतारमण यांच्या लगेच लक्षात आलं आणि त्याही हसल्या. त्यानंतर त्यांनी सभागृहात माफी मागत भाषणात दुरुस्ती केली. त्या बुधवारी (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना संसदेत बोलत होत्या.
सिगारेटवरील कस्टम ड्युटी वाढवण्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा!
Custom duty on cigarettes increased: FM Nirmala Sitharaman#UnionBudget2023
— ANI (@ANI) February 1, 2023
बिगर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी सुट्ट्यांच्या मिळणाऱ्या रकमेत २५ लाखांपर्यंत करामधून सूट देण्यात आली आहे.
देशात ४२.७ टक्के करांचे दर आहेत. सरचार्ज रेट ३७ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणण्याची घोषणा. यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे देशातील करांचे दर ३९ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
१५.५ लाख किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिक पगार असणाऱ्या व्यक्तीला ५२ हजार रुपयांचा यातून फायदा होणार..
नव्या करश्रेणीत २.५ लाखांपासून स्लॅब सुरू झाले होते. आता स्लॅब्जची संख्या ५ पर्यंत कम करण्यात आली आहे. त्यानुसार..
३ लाखांपर्यंत – कोणताही कर नाही
३ ते ६ लाख – ५ टक्के
६ ते ९ लाख – १० टक्के
९ ते १२ लाख – १५ टक्के
१२ ते १५ लाख – २० टक्के
१५ लाखांहून जास्त – ३० टक्के
#UnionBudget2023 | Personal Income Tax: "The new tax rates are 0 to Rs 3 lakhs – nil, Rs 3 to 6 lakhs – 5%, Rs 6 to 9 Lakhs – 10%, Rs 9 to 12 Lakhs – 15%, Rs 12 to 15 Lakhs – 20% and above 15 Lakhs – 30%, " says Union Finance Minister Nirmala Sitharaman pic.twitter.com/li3dXsHGfA
— ANI (@ANI) February 1, 2023
सध्या ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेले नागरिक कोणताही टॅक्स भरत नाही. ही मर्यादा ७ लाखांपर्यंत वाढवण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा. नव्या कररचनेचा स्वीकार करणाऱ्यांना ही पद्धती लागू होईल.
Personal income-tax | Income tax- rebate extended on income up to Rs 7 lakhs in new tax regime: FM Sitharaman pic.twitter.com/X8rmVH7Gh2
— ANI (@ANI) February 1, 2023
या वर्षी ६.५ हजार कोटींचे रिटर्न यावर्षी पूर्ण करण्यात आले आहेत. ४५ टक्के रिटर्न्स फक्त २४ तासांत पूर्ण करण्यात आले – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण
बॅटरीवर चालणाऱ्या आणि इलेक्ट्रिक वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा. या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता
अनेक वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा
गरीब कैद्यांना जामीन मिळवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली.
देशात मोबाईल फोनच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मोबाईल फोन्सच्या भागांच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव. बॅटरीजवरील कस्टम ड्युटी २.५ टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव.
Budget 2023 Live Updates, Nirmala Sitharaman Speech: केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ साठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणाचे प्रत्येक अपडेट