India Budget 2023-24 Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा आज सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच २०२३-२४ चा आर्थिक विकासाचा वेग ६ ते ६.८ टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे बाजारात काहीसं चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दुसरीकडे जागतिक पटलावर या वर्षी आर्थिक मंदीची जोरदार चर्चा असताना गेल्या काही दिवसांपासून देशाच्या आर्थिक आणि राजकीय वर्तुळात आजचा अर्थसंकल्प चर्चेचा विषय ठरला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने करदात्यांसाठी करपात्र रकमेत सूट देण्याची मोठी घोषणा केली आहे.

Live Updates

Budget 2023 Updates, Nirmala Sitharaman Speech: केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ साठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणाचे प्रत्येक अपडेट

11:13 (IST) 1 Feb 2023
पर्यटन व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली – अर्थमंत्री

भारतात देशांतर्गत आणि विदेशी पर्यटकांचा ओढा वाढला आहे. त्यातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पीपीपी, राज्य सरकारे आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी पर्यटन व्यवसायात मोठी वाढ झाली आहे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

11:10 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: भारतानं १०२ कोटी नागरिकांचं पूर्ण कोविड लसीकरण केलं – अर्थमंत्री

भारतानं १०२ कोटी नागरिकांचं पूर्ण कोविड लसीकरण केलं – अर्थमंत्री

11:07 (IST) 1 Feb 2023

गेल्या ९ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगभरात दहाव्या क्रमांकापासून पाचव्या क्रमांकापर्यंत विकसित झाली आहे – अर्थमंत्री

11:05 (IST) 1 Feb 2023
यूपीआय, कोविन अॅपमुळे जगानं भारताचं महत्त्व मान्य केलं – निर्मला सीतारमण

Budget 2023: अर्थमंत्र्यांचं भाषण सुरू असताना विरोधकांची घोषणाबाजी!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भाषण सुरू करताच विरोधकांनी 'भारत जोडो'च्या घोषणा दिल्या.

11:03 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: अर्थमंत्र्यांच्या भाषणाला सुरुवात…

हा देशाच्या अमृतकाळातला पहिला अर्थसंकल्प आहे – निर्मला सीतारमण

10:49 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: केंद्रीय मंत्रीमंडळाची अर्थसंकल्पास मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

10:45 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग पाचवा अर्थसंकल्प करणार सादर

केंद्रीय अर्थमंत्री म्हणून सलग पाचवा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा समावेश आता मनमोहन सिंग, दिवंगत अरुण जेटली, पी. चिदंबरम या माजी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या यादीत झाला आहे.

10:40 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: “यंदाचा अर्थसंकल्प निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेला नाही”

आत्ताचा अर्थसंकल्प निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून असणार नाही, तर देशाच्या कल्याणासाठीच्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव अर्थसंकल्पात असणार आहे. मोदींकडे दूरदृष्टी आहे. पुढच्या २५ वर्षांचा आमचा अजेंडा काय, त्याप्रमाणे अर्थसंकल्पात काय तरतुदी करायला हव्यात, याचं व्हिजन आजच्या अर्थसंकल्पात आहे – रावसाहेब दानवे

10:35 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: अर्थसंकल्प मांडण्याआधी निर्मला सीतारमण यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट! पाहा Video

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली.

10:29 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ बैठकीला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीला सुरुवात

10:23 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: अर्थसंकल्पाआधी सेन्सेक्सची उसळी!

अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात उसळी, ४५१ अंकांनी शेअर बाजार वधारला

10:13 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: थोड्याच वेळात केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक!

अर्थसंकल्पावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार.

10:12 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: राष्ट्रपतींचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अर्थसंकल्पाआधी चहापान!

राष्ट्रपती भवनावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह इतर उच्चपदस्थांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह चहापान केलं.

10:11 (IST) 1 Feb 2023
‘अर्थसंकल्पात महाराष्ट्र, मुंबईसाठी विशेष तरतूद करा,’ संजय राऊतांची केंद्राकडे मागणी; म्हणाले, “हा पैसा

ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनीदेखील या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच मुंबईसाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी केली आहे. वाचा सविस्तर

10:06 (IST) 1 Feb 2023
अर्थसंकल्प १ फेब्रुवारी, सकाळी ११ वाजताच का सादर होतो?

अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ ब्रिटिशांच्या काळात ठरली होती. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात दोन महत्त्वाचे बदल झाले. हे बदल वाचण्यासाठी सविस्तर बातमीवर क्लिक करा.

09:54 (IST) 1 Feb 2023
‘आदर्श अर्थसंकल्प’ काय असतो? ChatGPT ने दिलं भन्नाट उत्तर

चॅटजीपीटी या आर्टिफिशियल इंजेलिजन्स प्लॅटफॉर्मला आदर्श अर्थसंकल्प म्हणजे काय? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तुम्हालाही हे उत्तर वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल. वाचा सविस्तर बातमी

09:35 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: “..याचा विचार करायला सरकारकडे वेळ कुठे आहे?” ठाकरे गटाचा खरमरीत सवाल!

ठाकरे गटाकडून देशाच्या आर्थिक स्थितीबाबत केंद्रावर टीकास्र सोडण्यात आलं आहे. सामनातील अग्रलेखातून बुडीत कर्जाच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य करण्यात आलं आहे.

वाचा सविस्तर

09:17 (IST) 1 Feb 2023
Budget 2023 Expectation: निर्मला सीतारमण टॅबच्या लाल फाईलसह संसद भवनाकडे रवाना!

अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेच्या दिशेने रवाना…

08:53 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: निर्मला सीतारमण नॉर्थ ब्लॉकमधील अर्थमंत्रालयात पोहोचल्या!

अर्थसंकल्प २०२३ आज मांडला जाणार असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण नॉर्थ ब्लॉकमध्ये दाखल झाल्या आहेत.

08:49 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी भागवत कराडांनी केली पूजा!

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. यापूर्वी अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी पूजा केली.

08:34 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: आदर्श बजेट म्हणजे काय? ChatGPT नं दिलं भन्नाट उत्तर!

सध्या ChatGPT ची जोरदार चर्चा सुरू असून एका ट्विटर युजरनं चॅटजीपीटीला आदर्श अर्थसंकल्प म्हणजे काय? असं विचारताच चॅटजीपीटीनं त्यावर भन्नाट उत्तर दिलं.

08:30 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: गेल्या १० वर्षांत अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात कसे कल दिसले? पाहा!

गेल्या १० वर्षांत अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात कसे कल दिसले? पाहा!

08:28 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: मोदी म्हणतात, “आपल्या अर्थमंत्रीही महिला आहेत, त्या…!”

अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर स्तुतसुमनं उधळली. “आपल्या अर्थमंत्रीही एक महिला आहेत. त्या देशासमोर आणखीन एक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज जागतिक स्तरावर फक्त भारतच नाही, तर अवघ्या जगाचं भारताच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष आहे”, असं मोदी म्हणाले.

08:25 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: अर्थराज्यमंत्री भागवत कराडांची नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं!

प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती होत आहे. पंतप्रधानांनी २०१४मध्ये जेव्हा शपथ घेतली होती, तेव्हा भारत दहाव्या क्रमांकावर होता. आज पाचव्या क्रमांकावर आला आहे. गेल्या ८ वर्षांत आपण दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. – भागवत कराड

08:24 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: सुब्रह्मण्यम स्वामींचा निर्मला सीतारमण यांना टोला!

सुब्रह्मण्यम स्वामी म्हणतात, “अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची गेल्या तीन वर्षांमधली आर्थिक विकासासंदर्भातली अर्थसंकल्पीय भाषणे वाचा. सुदैवाने संसदेतील भाषणाबाबत कोणतंही उत्तरदायित्व नाहीये!”

08:19 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी केलेलं भाषण, पहा Video

अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी केलेलं भाषण, पहा Video

08:16 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: ‘परवानाराज’पासून संपूर्ण स्वातंत्र्य; आर्थिक पाहणी अहवालाचा ‘सुधारणा’पथाचा आग्रह

पाहणी अहवालानुसार, २०१४ पूर्वी केल्या गेलेल्या सुधारणा या प्रामुख्याने उत्पादन आणि भांडवली बाजाराच्या क्षेत्रातील होत्या.

वाचा सविस्तर

08:15 (IST) 1 Feb 2023
नऊ वर्षांत निर्गुतवणुकीतून ४.०७ लाख कोटींची उभारणी

चालू आर्थिक वर्षांत निर्गुतवणुकीच्या माध्यमातून ६५,००० कोटी रुपयांचा निधी उभारणीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते..

वाचा सविस्तर

08:14 (IST) 1 Feb 2023
Budget 2023: ‘जनधन’, ‘आधार’, ‘मोबाइल’मुळे करोना लसीकरणास मदत; अहवालानुसार ‘को-विन’ महासाथीत जीवनरक्षक

आर्थिक पाहणी अहवालानुसार ‘को-विन’ देशासाठी महासाथीच्या काळात जणू जीवनरक्षक असल्याचे सिद्ध झाले.

वाचा सविस्तर

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ लाइव्ह अपडेट

Budget 2023 Live Updates, Nirmala Sitharaman Speech: केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ साठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणाचे प्रत्येक अपडेट