पीटीआय, नवी दिल्ली

बनावट शाळा (डमी स्कूल) या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही आणि त्याबाबत गंभीर चर्चा करण्याची वेळ आली आहे, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी रविवारी सांगितले.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
state government decision 50 thousand teachers will get 20 percent subsidy increase
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
delhi school bomb hoax
४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत प्रधान म्हणाले, डमी शाळेच्या मुद्दय़ावर अनेक तज्ज्ञांनी मतप्रदर्शन केलेले आहे. ‘डमी स्कूल’ या सामान्य शाळेसारख्याच शाळा असतात. मात्र या शाळेत जाण्याची गरज नसते. या शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी भरमसाट शूल्क आकारले जाते. मात्र शाळांमध्ये प्रवेश केवळ नावालाच होतो. अशा प्रकारे शाळेत न जाणे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक वाढीस अडथळा आणते आणि त्यांना अनेकदा एकटेपणा आणि मानसिक तणाव जाणवतो. त्यामुळे या मुद्दय़ावर चर्चा करण्याची गरज असल्याचे मत प्रधान यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>>अफगाणिस्तानात तीव्र भूकंप; मृतांचा आकडा २०५३ वर, ९ हजाराहून अधिक जखमी

‘१०वी, १२वी परीक्षा दोनदा देणे बंधनकारक नाही’

विद्यार्थ्यांना वर्षांतून दोनदा १० वी आणि १२ वीच्या परीक्षेला बसणे बंधनकारक असणार नाही आणि एकाच संधीच्या भीतीने निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी हा पर्याय आणला जात आहे, असे प्रधान यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईईप्रमाणेच वर्षांतून दोनदा (१०वी व १२वी) परीक्षेला बसण्याचा पर्याय असेल. ते सर्वोत्तम गुण निवडू शकतात. परंतु ते पूर्णपणे वैकल्पिक असेल, कोणतीही सक्ती नाही.

एक वर्ष गमावले, त्यांची संधी गेली किंवा अधिक चांगली कामगिरी करता आली असती या विचाराने विद्यार्थी अनेकदा तणावग्रस्त होतात. एकाच संधीच्या भीतीमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी हा पर्याय आणला जात आहे,’’ असे प्रधान म्हणाले.

Story img Loader