गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. तर, करोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन ज्यामुळे अनेक देशांमध्ये करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले, त्याचा संसर्गही देशात वाढतोय. मंगळवारी दिवसभरात देशात २ लाखांच्या जवळपास रुग्ण आढळले आहेत. आता सापडत असलेल्या बहुतांशी रुग्णांना करोनाची सौम्य लक्षणं आढळत असल्यानं रुग्णालयात भरती होण्याचं प्रमाण कमी आहे. मात्र, तरीही पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध असेल याची खबरदारी घ्या, असं आवाहन करणारं पत्र केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आरोग्य सुविधांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची जास्तीत जास्त उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि तत्काळ उपाययोजना करण्यासाठी पत्र लिहिले आहे. त्यांच्या पत्रात, केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले, की राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये रूग्णांमध्ये सेवा देणाऱ्या आरोग्य सुविधांमध्ये किमान ४८ तास पुरेसा वैद्यकीय ऑक्सिजनचा बफर स्टॉक असावा, तसेच त्यांनी PSA प्लांट योग्यरित्या काम करताहेत की नाही हे तपासण्याचं आणि पुरेशा ऑक्सिजन केंद्रकांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासही सांगितलं.

सर्वच जिल्ह्यांत पुरेसे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स आहेत की नाही, याची खात्री करण्यासंही आरोग्य सचिवांनी सांगितलंय. व्हेंटिलेटर्स आणि इतर जीवनावश्यक आरोग्य सुविधा प्रत्येक जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात असायला हव्या, असंही त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.