पीटीआय, रायपूर

‘‘छत्तीसगडमधून नक्षलवादाचे ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्णपणे उच्चाटन करण्यास केंद्र सरकार आणि छत्तीसगड राज्य सरकार कटिबद्ध आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले. छत्तीसगड नक्षलवादाच्या धोक्यापासून मुक्त झाले, तर पूर्ण देश या धोक्यापासून मुक्त होईल, असेही ते म्हणाले.

रायपूरमध्ये राष्ट्रपतींच्या पोलिस पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या एका वर्षात छत्तीसगड पोलिसांनी नक्षलवादाविरुद्ध लढण्यामध्ये मोठी उपलब्धी गाठली आहे, असे ते म्हणाले. तसेच, छत्तीसगड सरकारच्या नक्षलवाद्यांसाठीच्या पुनर्वसन धोरणाचीही त्यांनी स्तुती केली. नक्षलवाद्यांना हिंसा सोडून मुख्य प्रवाहात येण्याचेही आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा >>>Zakir Hussain Passed Away : “त्यांची कला सदैव आठवणीत राहील”, झाकीर हुसैन यांना राहुल गांधींनी वाहिली आदरांजली

पोलिसांचे कौतुक

‘गेल्या वर्षभरात छत्तीसगडमध्ये २८७ नक्षलवादी ठार करण्यात आले. सुमारे एक हजार नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आणि ८३७ नक्षलवादी शरण आले,’ असे सांगून अमित शहा यांनी पोलिसांचे कौतुक केले. शहा यांनी या वेळी सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी नक्षलवाद्याच्या धोक्यापासून राज्य मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली आहे. केंद्र सरकारही त्यांच्या या प्रतिज्ञेची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध आहे. आपण मिळून नक्षलवादाचा धोका ३१ मार्च २०२६ पूर्वी संपवू. छत्तीसगड नक्षलवादमुक्त झाले, तर पूर्ण देश या धोक्यापासून मुक्त होईल. – अमित शहाकेंद्रीय गृहमंत्री

Story img Loader