केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या अधिकृत भाषा समितीने हिंदी भाषेसंदर्भातील एका अहवालात काही शिफारसी केल्या आहेत. केंद्रीय विद्यालयं, आयआयटी आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये हिंदी माध्यम अनिवार्य करण्यात यावं, इंग्रजी भाषेतील सरकारी भरती प्रक्रियेतील पेपर हिंदीत घेण्यात यावे आणि संयुक्त राष्ट्रामध्ये हिंदी भाषेला अधिकृत म्हणून जाहीर करण्यात यावं, या शिफारसी अहवालात करण्यात आल्या आहेत. हा अहवाल गृहमंत्री अमित शाह यांनी सप्टेंबरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला आहे.

फेसबूक आणि इन्स्टाग्राम वापरा तुमच्या आवडत्या भाषेत; या स्टेप्स वापरून लगेच करा बदल

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी

या अहवालावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. हा अहवाल भारतातील हिंदी भाषिक नसलेले लोक सहजरित्या फेटाळतील, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. मोदी सरकार आणि बिगर हिंदी भाषिक राज्यांमधील संघर्षाचे परिणाम देशासाठी विनाशकारी ठरतील, असा इशारा चिदंबरम यांनी दिला आहे.

हल्ला करणाऱ्यांचं बोट, हात नाहीतर थेट शिरच्छेद करा; विश्व हिंदू सभेच्या रॅलीत प्रक्षोभक भाषण

हिंदी भाषिक राज्यांमधील न्यायालयांचे कामकाज हिंदी भाषेत व्हावे, अशीही शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. जे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी मुद्दाम हिंदीमध्ये कामकाज करत नाहीत, त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले पाहिजे, असेही या अहवालात म्हटले आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्या वार्षिक कामगिरी अहवालात या आशयाची नोंद केली जावी, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Mulayam Singh Yadav Death: मुलायम सिंह यादव यांचं निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राजभाषा अधिनियम १९६३ नुसार संसदेच्या अधिकृत भाषा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत २० लोकसभेच्या आणि १० राज्यसभेच्या खासदारांचा समावेश आहे. शासकीय कामकाजात हिंदीच्या वापराबाबतच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी या समितीची निर्मिती करण्यात आली आहे.

Story img Loader