पीटीआय, नवी दिल्ली

काश्मीरमध्ये अवलंबिण्यात आलेले क्षेत्रीय वर्चस्व आणि शून्य दहशतवाद धोरण जम्मू विभागातही काटेकोरपणे राबविण्यात यावे, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी अधिकाऱ्यांना दिली. नवी दिल्लीमध्ये जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत त्यांनी दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचेही सांगितले.

jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?

गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेकी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. तुलनेने शांत असलेल्या रियासी जिल्ह्यात गोळीबारानंतर वैष्णोदेवी यात्रेकरूंची बस दरीत कोसळून अपघात झाला होता. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सर्वप्रकारचे उपाय योजण्याचे आदेश दिले. रविवारी शहा यांनी घेतलेल्या बैठकीत प्रामुख्याने जम्मू विभागाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. संपूर्ण राज्यात दहशतवादाचा बीमोड करायचा असेल, तर काश्मीरप्रमाणेच जम्मूमध्येही योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे शहा यांनी यावेळी नमूद केले. २९ तारखेपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आढावाही यावेळी घेण्यात आला. बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, भावी लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी व गुप्तहेर संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.