लखीमपूर खेरीप्रकरणी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शिवीगाळ
लखीमपूर खेरी शेतकरी हिंसाचारप्रकरणी टीकेचे लक्ष्य झालेल्या केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी आता नवा वाद ओढवून घेतला आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर मिश्रा यांचे क्रोधावर नियंत्रण राहिले नाही. या पत्रकाराच्या अंगावर धावून जात त्यांनी त्यास शिवीगाळ केली.
केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी आपल्याला धमकावले आणि आपल्या हातातील मोबाइल हिसकावून घेतल्याचा आरोपही या पत्रकाराने केला आहे.
लखीमपूर खेरी येथे ३ ऑक्टोबर रोजी वाहनांखाली चिरडून चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता आणि हेतूपूर्वक हत्या घडवून आणली होती, असा निर्वाळा विशेष तपास पथकाने मंगळवारी दिल्याने विरोधकांनी अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. या हिंसाचार प्रकरणात अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मुख्य आरोपी आहे.
विशेष तपास पथकाच्या या अहवालाविषयी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर मिश्रा यांचे रागावर नियंत्रण राहिले नाही आणि ते या पत्रकाराच्या अंगावर धावून गेले. ‘असले मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस. तुझे मानसिक संतुलन बिघडले आहे. तुला काय माहिती आहे या प्रकरणाबद्दल? तुम्ही एका निर्दोष व्यक्तीला आरोपी करत आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे,’ अशा शब्दांचा भडिमार त्यांनी या पत्रकारावर केला. मिश्रा यांनी प्रसारमाध्यमांना ‘चोर’ असे संबोधले आणि मोबाइल तात्काळ बंद करण्यास सांगितले.