केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि अभिनेता रणवीर सिंग हे सोमवारी २८ मार्च रोजी दुबई एक्स्पो २०२० च्या इंडियन पॅव्हेलियनमध्ये होते. यावेळी रणवीर आणि अनुराग ठाकूर यांनी एकत्र येत डान्स केला. दोघांनी २०१६ मध्ये आलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील गाणे ‘मल्हारी’वर जोरदार डान्स केला. या गाण्यावर एकत्र नाचतानाचा या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अनुराग ठाकूर यांनीही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योगाच्या ग्लोबल रीचवर रणवीरसोबत चर्चा करण्यासाठी अनुराग ठाकूर इंडिया पॅव्हेलियनमध्ये होते. यावेळी रणवीर सिंग लाल कुर्ता आणि पायजमा घालून होता तर अनुराग ठाकूर सूटमध्ये होते.

या कार्यक्रमात अनुराग ठाकूर यांनी भारतीय चित्रपट उद्योगातील योगदानाबद्दल सांगितले. तसेच “दुबई एक्स्पोच्या इंडियन पॅव्हेलियनमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. योग, आयुर्वेद, पर्यटन, वस्त्रोद्योग, कॉस्मिक वर्ल्ड आणि सिनेमा यांमध्ये येथील लोकांनी खूप रस दाखवला. सुमारे १७ लाख लोकांनी इंडियन पॅव्हेलियन पाहिले,” असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.

तर, रणवीर सिंग म्हणाला की, “परदेशातील भारतीय चित्रपटांच्या माध्यमातून भारताशी जोडले जातात. भारतीय मनोरंजन क्षेत्र येत्या काळात जागतिक स्तरावर खुप चांगलं काम करेन. आमच्या चित्रपटातील कथा लोकांमध्ये गुंजतात आणि त्या सांस्कृतिक सीमा ओलांडून परदेशातील भारतीय चित्रपटांद्वारे भारताशी जोडले जातात,” असं त्याने सांगितलं.