नवं संसद भवन हे त्याच्या उद्घाटनामुळे जितकं चर्चेत आहे तितकंच त्यावरुन होणाऱ्या वादामुळेही चर्चेत आहे. काँग्रेससह १९ पक्षांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना या उद्घाटन सोहळ्याला का बोलवलं गेलं नाही? राष्ट्रपतींच्या हस्तेच या नव्या संसदेचं उद्घाटन व्हायला पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आता भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हटलं आहे नितीन गडकरींनी?

“नवं संसद भवन हे आपल्या राष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. हे भवन कुठल्याही एका पक्षाचं नाही. नव्या संसदेला विरोध दर्शवणं याला काहीही अर्थच नाही. उलट नव्या संसदेचं उद्घाटन करण्यासाठी सगळ्या पक्षांनी एकजूट करुन एकत्र यायला हवं. तसंच विरोधक काय म्हणतात? त्याला प्रत्येक वेळी उत्तर दिलंच पाहिजे असंही नाही.” असं म्हणत नितीन गडकरींनी या मुद्द्यावर उत्तर दिलं आहे. टीव्ही ९ भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत हा उल्लेख नितीन गडकरींनी केला आहे.

२ हजारांच्या नोटा वितरणातून मागे घेण्याचा निर्णयही योग्यच

दोन हजारांच्या नोटा वितरणातून मागे घेण्याचा निर्णयही योग्यच आहे. हा निर्णय देशहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे देशाचं हित साधलं जाणार आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट होणार आहे. दोन हजारांच्या नोटांचा उपयोग चुकीच्या गोष्टींसाठी होत होता. यामुळे भ्रष्टाचारालाही आळा घालता येणार आहे. ज्यांच्याकडे या नोटा आहे त्या बँकेत बदलून घेता येणार आहेत. नितीन गडकरी पुढे म्हणाले २०१९ मध्ये मोदींना जनतेने पुन्हा कौल दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात विकास झाला आहे. सबका साथ, सबका विकास या तत्त्वावर ते काम करत आहेत असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.