काँग्रेसचे वरिष्ठ नेते व केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री सीसराम ओला (वय ८६) यांचे आज (रविवार) रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते काही दिवसांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त होते.
झुंझुनू मतदार संघातून निवडून आलेले ओला यांनी आठ वेळा विधानसभा आणि पाच वेळा लोकसभा निवडणूक जिंकली होते. समाज सेवेसाठी त्यांना १९६८ मध्ये पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या महिनाभरापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे राजस्थानमधील निवडणुकांसाठीच्या प्रचारात ते सहभागी झाले नव्हते. रविवारी गुडगावमधील रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Story img Loader