केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chauhan ) यांनी राज्यसभेत आज काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसला शकुनी, द्यूत आणि चक्रव्यूह याचीच आठवण का येते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत जे भाषण केलं होतं त्या भाषणात त्यांनी चक्रव्यूहाचा उल्लेख केला होता. त्यानंतर आज राज्यसभेत त्यांनी त्यांनी टोलेबाजी करत राहुल गांधी आणि काँग्रेसला उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले शिवराज सिंह चौहान?
कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chauhan ) राज्यसभेत मंत्रालयाच्या कामकाजावर बोलत होते. त्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर देताना जोरदार टीका केली. “काँग्रेसला कायम, द्यूत, चक्रव्यूह या गोष्टी का आठवतात? शकुनी कपट करण्यासाठी प्रसिद्ध होता, द्यूत खेळताना त्याने कपट केलं. त्यानंतर चक्रहव्यूहात एखाद्याला घेरलं जातं आणि मारलं जातं. आता काँग्रेसचा खरा चेहरा काय आहे? हेच सगळ्यांना दिसतं आहे. आम्ही जेव्हा महाभारताचा उल्लेख करतो तेव्हा आम्हाला भगवान श्रीकृष्ण दिसतात. विरोधी पक्षाला मात्र कपट आणि द्वेष हेच दिसतं. त्यामुळे ते शकुनी, द्यूत, कपट याचं उदाहरण देतात.” असं शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chauhan ) म्हटलं आहे.
जवाहारलाल नेहरुंचं नाव घेत काँग्रेसवर टीका
जवाहरलाल नेहरु आपल्या देशाचे पंतप्रधान होते, मी त्यांचा आदर करतो. ते रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. तिथलं रशिया मॉडेल पाहिलं. त्यानंतर अमेरिकेतला लाल गहू भारतात आणला तो देशाचा जनतेला खाऊ घतला. चौधरी चरण सिंह यांनी ही बाब सांगितल्याचा उल्लेख शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chauhan ) यांनी भाषणात सांगितलं.
हे पण वाचा- Rahul Gandhi: राहुल गांधींची पोस्ट आणि देशभरात खळबळ, “मला आतल्या गटातून माहिती मिळाली की..”
शिवराज चौहान यांची इंदिरा गांधींवर टीका
शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chauhan ) पुढे म्हणाले इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा लेवी वसुली सक्तीने केली जात होती. भारत आत्मनिर्भर झाला नव्हता, राजीव गांधी यांनी शेती धोरणाबाबत चर्चा केली. मात्र शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष दिलं नाही. २००४ ते २०१४ या कालावधीत फक्त घोटाळे आणि घोटाळेच देशाने पाहिले. भारताच्या राजकीय क्षितिजावर एका दैदीप्यमान सूर्याचा उदय झाला. हा सूर्य म्हणजे नरेंद्र मोदी. त्यांनी शेती क्षेत्रातील प्राथमिकताच बदलल्या. तसंच जगाला देशाचं महत्त्व पटवून दिलं. असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
शेतकऱ्यांना प्राधान्य देणं ही आमची प्राथमिकता आहे
उत्पादन वाढवणं,योग्य हमीभाव देणं या आमच्या प्राथमिकता आहे. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. असंही शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. २०१३-१४ या वर्षात युपीए सरकारने २७ हजार कोटींच बजेट शेतीसाठी होतं. आम्ही ते वाढवून १ लाख ३२ हजार कोटींवर नेलं आहे. डेअरी, फिशरीज, जोडव्यवसाय या सगळ्यांना आम्ही प्राधान्य देत आहोत. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी रिव्हर लिंकिंग अर्थात नदीजोड प्रकल्पाचा उल्लेख केला होता. आम्ही त्यासाठी काम करत आहोत.