उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यात एका महिलेने चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्मानंतर डॉक्टरांसह त्याच्या आई-वडिलांनाही धक्काच बसला. बाळाची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितलं आहे. गावकरी हा दैवी चमत्कार असल्याचं मानून बाळाला पाहायला एकच गर्दी करत आहे. मात्र, डॉक्टरांनी याबाबत आत्ताच काहीही सांगता येणार नलसल्याचं म्हटलं असून वैद्यकीय तपासणीनंतरच याबाबत भाष्य करता येईल असं सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील जिगिना गावात भूलन निषाद हे आपली पत्नी रंभा(गुडीया) हिच्यासोबत राहतात. मोलमजुरी करुन भूलन हे आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. रंभाला शनिवारी (15 सप्टेंबर) प्रसूतीकळा सुरू झाल्याने स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिने या बाळाला जन्म दिला. मात्र चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाला पाहून डॉक्टरांसह त्याच्या आई-वडिलांनाही धक्काच बसला. याबाबतची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी हा दैवी चमत्कार मानून बाळाला पाहायला एकच गर्दी केली. सध्या बाळाला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.