भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर जगभरातून संताप व्यक्त केला जातोय. शर्मा यांच्या या टिप्पणीवर सौदी अरेबिया, इराण तसेच इतर मुस्लीम राष्ट्राने निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणावर संयुक्त राष्ट्रानेदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा >>> प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: “देवेंद्र फडणवीसांनी कॉल केला आणि म्हणाले, बेटा…”; नुपूर शर्मांच्या मुलाखतीचा Video चर्चेत
संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “याबद्दल मी काही बातम्या वाचल्या आहेत. मी या प्रकरणाशी निगडित टिप्पण्यादेखील पाहिलेल्या नाहीत. मात्र आम्ही सर्व धर्मांचा आदर करण्यास तसेच सहिष्णुतेस प्रोत्साहन देतो,” असे महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन डुजारेक म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> गोव्यात ब्रिटीश महिला पर्यटकावर बलात्कार, एकास अटक
दुसरीकडे हा वाद आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्यानंतर भाजपाने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं आहे. तसेच त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो असे स्पष्टीकरण भाजपाला द्यावे लागले. तर नुपूर शर्मा यांचे वक्तव्य आणि भारत सरकार यांच्यात काहीही संबंध नसल्याचे सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा >>> प्रेषित अवमानप्रकरणी नेदरलँडच्या खासदाराने केले नुपूर शर्मांचे समर्थन; म्हणाले, भारताने माफी का मागवी?
दरम्यान, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, यूएई, जॉर्डन, बहरीन आणि अफगाणिस्तान, मालदीव, पाकिस्तान अशा अनेक देशांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या अवमानकार टिप्पणीचा निषेध केलेला आहे.