संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी भारत आणि चीनदरम्यान उसळलेल्या अभूतपूर्वी संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी संयम ठेवावा असं आवाहन गुतारेस यांनी केलं आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच, सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात अचानक उसळलेल्या अभूतपूर्व संघर्षांमध्ये चीनचे ४३ सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. भारताचेही २० जवान शहीद झाले असून, यात भारताच्या कर्नल हुद्दय़ाच्या लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे. यामुळे उभय देशांदरम्यान तणाव वाढला आहे. चीनच्या सीमेवर अशा प्रकारे भारतीय जवान शहीद होण्याची अशी घटना १९७५नंतर प्रथमच घडली आहे. भारत आणि चीन दोन्ही बाजूच्या सैन्याची जिवीतहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय लष्कराने जारी केलेल्या माहितीनुसार पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४३ जवान ठार अथवा जखमी झाल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांना प्राण गमावावा लागल्याने गुतारेस यांनी दुख: व्यक्त केलं आहे. गुतारेस यांचे प्रवक्त्यांनी मंगळवारी रात्री उशीरा एक पत्रक जारी केलं.

नक्की वाचा >> भारत आणि चीन दोघांसाठी गलवाण खोरं इतकं महत्वाचं का आहे?

गुतारेस यांचे प्रवक्ते एरी कनेको यांनी पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही देशांमधील वाढत्या तणावासंदर्भात वक्तव्य केलं. “भारत आणि चीनदरम्यान प्रत्यक्ष ताबारेषेवरील (एलएसी) आणि सैनिकांच्या मृत्यूची बातमी समोर येत असून यासंदर्भात संयुक्त राष्टाला चिंता वाटत आहे. आम्ही दोन्ही देशांना संयम राखण्याचं आवाहन करत आहोत,” असं कनेको यांनी म्हटलं आहे.

 

Story img Loader