संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी व दहशतवादी संघटनांची यादी बुधवारी जाहीर केली. या यादीतील १३९ दहशतवादी हे पाकिस्तानमधील असल्याने पाकची नाचक्की झाली असून या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि लष्कर- ए- तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने जाहीर केलेल्या यादीनुसार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडे असंख्य बनावट पासपोर्ट असून रावळपिंडी आणि कराचीतून हे पासपोर्ट जारी करण्याते आले होते. कराचीत दाऊदचा बंगला असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत १३९ जण पाकिस्तानचे आहेत. यात अल- जवाहिरीचा नंबर पहिले लागला आहे. ओसामा बिन लादेनचा निकटवर्तीय असलेला अयमान अल- जवाहिरी अजूनही अफगाणिस्तान- पाकिस्तान सीमेवर लपून बसल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. मुंबई हल्ल्यांचा सूत्रधार हाफिज सईदचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय सईदच्या दहशतवादी संघटनेचाही या यादीत समावेश आहे.

येमेनचा नागरिक आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी मोहम्मद बिन अल शेबाह याचा देखील या यादीत समावेश आहे. याशिवाय ‘लष्कर’शी संबंधित अल मन्सूरियन, पासबान- ए- काश्मीर, जमात उद दावा, फलाह- ए- इन्सानियत फाऊंडेशन या संघटनांचाही दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: United nations security council released list of terrorist 139 from pakistan dawood ibrahim hafiz saeed on list