भारतीय कंपन्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे ‘सुशिक्षित’ पदवीधर सध्या विद्यापीठ यंत्रणा तयार करत नाही़  त्यामुळे कंपन्या प्रशिक्षणाचा वेश पांघरून उच्च शिक्षण क्षेत्रात प्रवेश करीत आहेत, अशी खंत उच्च शिक्षण राज्यमंत्री शशी थरूर यांनी सोमवारी येथे व्यक्त केली़
येथे दोन दिवसांच्या उच्च शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आह़े  या परिषदेला संबोधित करताना थरूर बोलत होत़े  पूर्वीचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता कालबाह्य ठरले आह़े  अशा वेळी चीन आणि मध्य-पूर्वेतील देश परदेशातील विद्यापीठांनी त्यांच्या देशात शाखा स्थापन करव्यात, यासाठी अनेक मार्ग-आडमार्गाचा वापर करत आह़े  भारत मात्र सध्या अशा शैक्षणिक संस्थांपासून फारकत घेत आहे, असे मतही त्यांनी या वेळी मांडल़े
मनुष्य बळ विकासमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, चांगल्या उच्च शिक्षण संस्था भारतात येऊ लागल्या, तर मोठय़ा संख्येने भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागणार नाही़  त्यामुळे आम्हीही तशाच प्रकारच्या सुधारणा करण्याच्या प्रयत्नांत आहोत़  विज्ञान, नावीन्यपूर्ण संशोधन अशी एकूण ५० केंद्रे भारतात स्थापन करण्याचे प्रस्तावित असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली़

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा