राजस्थानात खळबळजनक घटना समोर आली आहे. झालावाड शहरात राहत असणारी तरुणी आपल्या मित्राबरोबर लोटीयाझार जंगलात फिरायला गेली होती. तेव्हा अज्ञात व्यक्तीने तरुणीला जंगलात नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने गुन्हा दाखल केला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तरुणी शाळेनंतर आपल्या मित्राबरोबर आकाशवाणीजवळ असलेल्या जंगलात फिरण्यासाठी गेली होती. तेव्हाच एकाने दोघांचा जंगलात बसलेला व्हिडीओ बनवला. यानंतर अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दहा हजार रुपयांची मागणी दोघांकडे केली. पण, तरुणी आणि तिच्या मित्राने पैसे नसल्याचं सांगितलं. यावर आरोपीने तरुणाला पैसे आणण्याची धमकी दिली.
हेही वाचा : अमेरिकेतल्या टेक्सासच्या शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार, ८ जण ठार तर ७ जखमी
भीतीने तरुण पैसे आणण्यासाठी दुचाकीवरून शहरात गेला. तर, अज्ञात व्यक्तीने तरुणीला तिथेच थांबवून ठेवलं होते. यानंतर या व्यक्तीने तरुणीला हत्याराचा धाक दाखवत जंगलात घेऊन गेला. तिथे तिच्यावर बलात्कार केला. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : मणिपूरमध्ये तणावपूर्ण शांतता, परिस्थिती पूर्वपदाकडे ; हिंसाचाराचे ५४ बळी
पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.