Kuldeep Sengar Bail : दिल्ली उच्च न्यायालयाने उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी भाजपाचे निलंबित नेता कुलदीप सिंग सेंगर याला डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी ४ फेब्रुवारी पर्यंत अंतरीम जामीन मंजूर केला आहे. सेंगरची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया (cataract surgery) दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) मध्ये मंगळवारी होणार असल्याचे नमूद करत न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि हरिश वैद्यनाथन शंकर यांनी त्याच्या शिक्षेला स्थगिती दिली. याबरोबरच न्यायालयाने त्याला ५ फेब्रुवारीपर्यंत कारागृह प्रशासनासमोर आत्मसमर्पन करण्याचे निर्देशही दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान सेंगरच्या वकीलांनी कोर्टात सेंगरची शस्त्रक्रिया त्याच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीमुळे नियोजित वेळी होऊ शकली नाही असं सांगितलं. त्यानंतर सेंगरला आता ४ फेब्रुवारी रोजी नियोजित वैद्यकीय प्रक्रियेसाठी एम्समध्ये दाखल करणे आवश्यक असल्याने आणखी दोन दिवस हवे असल्याचेही त्यांनी कोर्टात सांगितले. याच शस्त्रक्रियेसाठी न्यायालयाने यापूर्वीही सेंगर याला अंतरिम जामीन मंजूर केला होता.

दरम्यान याचिकेला विरोधा करत सेंगर याला अंतरिम जामीन देता येणार नाही असा युक्तिवाद पीडितेच्या वकिलाने केला.

२०१७ मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अफहरण आणि बलात्कार केल्याचा आरोप सेंगर याच्यावर आहे. १ ऑगस्ट २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्तर प्रदेशातील ट्रायल कोर्टातून बलात्कार आणि संबंधित घटले दिल्लीत हस्तांरित करण्यात आले आहेत.