Girl Ran With Sister In Law For Same Sex Marriage: उत्तर प्रदेशातील उन्नावमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीने आपल्या वहिनीशी विवाह करण्यासाठी हट्ट धरल्याचे कळते आहे.

या प्रकरणातील तरुणी आणि तिच्या वहिनीमध्ये गेल्या सहा महिन्यांत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दरम्यान त्यांच्यातील प्रेमसंबंधातून वाद निर्माण झाल्यानंतर तरुणीने कथितरित्या विष प्राशन केले आहे. सध्या तरुणीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्या कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी बांगरमाऊतील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.

AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Sadhvi Pragya Sing Thakur
Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञा यांनी पोस्ट केला सुजलेल्या चेहऱ्याचा फोटो; म्हणाल्या, “मी जगले वाचले तर काँग्रेसच्या टॉर्चरविरोधात…”
shocking video
पर्यटकांच्या अंगावर कोसळला बर्फाचा भलामोठा भाग अन् …, बर्फाळ प्रदेशात जाण्याआधी हा अंगावर काटा आणणारा Video एकदा पाहाच
Rumeysa Gelgi explained why she flies on a stretcher
जगातील सर्वात उंच महिला कसा करते विमान प्रवास? Viral Video पाहून व्हाल थक्क
Pune, girl call center was attacked, yerawada area
पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात
Ram Kapoor recently shared his personal struggles with weight loss,
“दोनदा ३० किलो वजन कमी केले पण पुन्हा ‘जैसे थे’! नेमके चुकले कुठे? राम कपूरने केला खुलासा, तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
What is grooming gangs and the politics elon musk
UK’s Grooming Gangs: ब्रिटनमधील हजारो मुलींचे पाकिस्तानी पुरुषांनी केले लैंगिक शोषण; एलॉन मस्क यांनी आवाज उठवताच ‘ग्रुमिंग गँग’ चर्चेत

या प्रकरणातील तरुणी आणि तिची वहिनी लग्न करण्याच्या हट्टाने घरातून पळून गेल्या होत्या. पण, त्यांना पोलिसांनी शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर वहिनीचा पती तिच्यापासून वेगळा झाला आहे.

हे ही वाचा : ‘एचएमपीव्ही’चे आधीपासूनच अस्तित्व! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती; परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची ग्वाही

हे प्रकरण उन्नावच्या बेहाता मुजावर परिसरातील आहे. तरुणीची तिच्या वहिनीशी चांगली मैत्री झाली होती. गेल्या सहा महिन्यांत त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तरुणी आणि तिच्या वहिनीच्या नात्याबद्दल कळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना यावर आक्षेप घेतला होता.

काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील तरुणी आणि तिची वहिनी पळून गेल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले होते. या प्रकरणावर बोलताना तरुणीच्या वडिलांनी सांगितले की, “विषबाधेच्या घटनेनंतर त्यांच्या मुलीला रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिला विवाहित महिलेशी लग्न करायचे आहे, परंतु त्यांच्या कुटुंबीयांचा याला विरोध आहे.

हे ही वाचा : Nepal Earthquake Video : नेपाळमध्ये ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; दिल्ली, बिहारसह पश्चिम बंगालमध्ये जाणवले धक्के

दशकभरापूर्वी घडली होती अशीच घटना

यापूर्वी २०१३ मध्ये बिहारमधील पाटण्यातील दोन मुली एकमेकींशी लग्न करण्यासाठी घरातून पळून गेल्याची घटना घडली होती. त्यावेळी एका मुलीच्या वडिलांनी दुसऱ्या मुलीच्या कुटुंबाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

रीमा आणि आकांशा (नावे बदलली आहे) लग्न केल्यानंतर बिहारच्या रोहतासच्या सासाराम येथील हॉटेलमध्ये राहत होत्या. तेथे त्यांना पोलिसांनी पकडले होते. या दोन्ही मुलींनी ४ ऑक्टोबर २०१३ रोजी पळून जात सासाराम येथील मंदिरात लग्न केले होते. दरम्यान देशातील समलैंगिक विवाहाची ही बहुधा पहिली घटना असल्याचे त्यावेळी पोलिसांनी सांगितले होते. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

Story img Loader