पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. पुंछ जिल्ह्यात कृष्णा घाटी भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने पुन्हा गोळीबार सुरू केला आहे. या गोळीबारात महराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कार्वे गावचे सुपूत्र राजेंद्र तुपारे यांच्यासह आणखी एका जवानाला वीरमरण आले. तुपारे हे पुंछ येथे कार्यरत होते. या गोळीबारात दोन नागरिकही जखमी झाले आहेत. भारतीय लष्कराकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

राजेंद्र तुपारे हे २००२ साली लष्करात दाखल झाले होते. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारात महाराष्ट्राने आतापर्यंत सहा वीर गमावले आहेत. यापूर्वी नितीन कोळी (बुधगाव, सांगली), चंद्रकांत गलांडे (सातारा), संदीप ठोक (खंडजगळी, नाशिक), पंजाब उईके (नांदगाव, अमरावती), विकास कुळमेथे (पुराड, यवतमाळ).
पाकिस्तान जाणूनबुजून सामान्य नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास या गोळीबारास सुरूवात झाली. त्यानंतर रविवारी सकाळी पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. नियंत्रण रेषेवरच्या चौक्या तसेच सैन्यविरहित भागांवर पाकिस्तानने गोळीबार सुरू केला आहे. पुंछ भागात पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे.  भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने आतापर्यंत ९९ हून अधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

Story img Loader