अमेरिकेत फेसबुक, गुगल, स्काइप या बडय़ा इंटरनेट सेवा कंपन्यांच्या सव्र्हरमधील माहितीवर ओबामा प्रशासनाने डल्ला मारल्याची बातमी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ व ‘गार्डियन’ यांनी दिल्यानंतर झोपी गेलेले नेटीझन्स जागे झाले. एवढेच नव्हे तर फोन कॉल्सची माहितीही ओबामा प्रशासनाने घेतली आहे. तुम्ही काय बोलत होतात हे आम्हाला कळत नव्हते पण कुणाशी बोलत आहात एवढेच आम्ही बघितले, असा शहाजोग खुलासाही ओबामा यांनी केला आहे. हा माहितीवर दरोडा घालण्याचा प्रकार ‘प्रिझ्म’ या योजनेअंतर्गत फार पूर्वीपासून अमेरिकेत चालू आहे फक्त आता तो चारचौघात उघड झाला एवढेच. नाही म्हणायला ओबामा यांनी त्यांच्या पूर्वसुरींनी जे केले त्याच्या काही पावले पुढे टाकली आहेत हे वेगळे सांगायला नको. त्यामुळेच या प्रकाराने नेटीझन्सचे स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा आरोप जागरूक अमेरिकी नेटकरांनी नेटाने केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा