राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी भाजपाकडून ऑफर मिळाल्यानंतर वारंवार आपण त्यांच्यासोबत जाणार असल्याचं वृत्त फेटाळत आहेत. ‘मी नाणं नाही जे पलटेन’ असं म्हणत भाजपाची ऑफर नाकारणाऱ्या जयंत चौधरी यांनी आपल्याला हेमा मालिनी होण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मथुरामध्ये आयोजित सभेत बोलताना जयंत चौधरी यांनी हेमा मालिनींचा उल्लेख करत टोला लगावला. जयंत चौधरी यांनी मंचावर उपस्थित आपल्या नेत्याचा उल्लेख करत म्हटलं की, “योगेश सांगत होते की, अमित शाह त्यांना म्हणाले आमच्या पक्षात या आम्ही तुम्हाला हेमा मालिनी करु”. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!
ravi rana resign
अमरावती : नवनीत राणा म्‍हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”

पुढे ते म्हणाले की, “ते माझ्याबद्दलही अनेक गोष्टी बोलत होते. त्यांना आपल्याप्रती प्रेम वैगेरे काही नाही. आणि मी म्हणतोय मला खूश करुन काय मिळणार. मला हेमा मालिनी व्हायचं नाही. जनतेसाठी काय करणार? त्या ७०० शेतकऱ्यांसाठी काय करणार? टेनी मंत्री का झाले आहेत? रोज सकाळी उठून द्वेष पसरवत असतात”.

“इलाज करा, भाजपा नेत्यांची चरबी उतरवा”

जयंत चौधरी म्हणाले की, “ही संधी आहे, जर आपण पुन्हा चुकलो तर विचार करा त्यांचे रंग अजून किती बदलतील. म्हणून इलाज करणं गरजेचं असून भाजपा नेत्यांना जी चरबी आहे ती उतरवली पाहिजे. जर तुम्ही हा उमेदवार, तो उमेदवार अशा भानगडीत पडलात आणि चुकलात तर पुढील काळात दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांसंबंधी बोलण्याची हिंमत कोणाची होणार नाही”.

Story img Loader