लहान मुलांना खाण्यासाठी बाजारात हल्ली वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट, चघळण्याच्या गोळ्या येतात. मुलांना याचे आकर्षण असले तरी पालकांनी अधिक सजग होत, आपली मुले काय खात आहेत? हे पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पैसे कमविण्यासाठी अनेक कंपन्या लहान मुलांसाठी चॉकलेट आणि इतर खाऊ उत्पादित करत असतात, मात्र त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका चार वर्षांच्या लहान मुलाने दुकानात मिळणारी गोळी खाल्ली. मात्र गोळी घशात अडकल्यामुळे मुलाला श्वास घेण्यात अडचण निर्माण झाली आणि तीन तासांच्या संघर्षानंतर त्याने जीव सोडला.

रविवारी (३ नोव्हेंबर) कानपूरच्या बर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, डोळ्याच्या आकाराची दिसणारी फ्रुटोला कँडी नामक गोळी मुलाने खाल्ली होती. मात्र चघळत चघळता ही गोळी त्याच्या थेट घशात गेली. घराजवळील एका दुकानात त्याने ही गोळी विकत घेतली होती. गोळी घशात अडकल्यामुळे मुलाचा दृर्दैवी मृत्यू झाला.

Bengaluru Diwali Firecrackers accident
VIDEO: “फटाक्यावर बसला तर नवीकोरी रिक्षा घेऊन देऊ”; तरुणाला पैज भारी पडली, मृत्यूचा थरार कॅमेरात कैद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
CJI Chandrachud
CJI Chandrachud : “सरकारविरोधात निकाल देणं म्हणजे…”, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी सरन्यायाधीशांचं परखड मत
supreme-court-
“प्रत्येक वैयक्तिक मालमत्ता समाजासाठी उपयुक्त संपत्ती असू शकत नाही”, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!
Supreme Court Verdict on Madrasa Education Act
UP Madarsa Act: मदरसा शिक्षण मंडळ कायदा घटनात्मक; सर्वोच्च न्यायालयाचा योगी आदित्यनाथ सरकारला झटका, उच्च न्यायालयाचा निकाल फेटाळला
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे वाचा >> VIDEO: “फटाक्यावर बसला तर नवीकोरी रिक्षा घेऊन देऊ”; तरुणाला पैज भारी पडली, मृत्यूचा थरार कॅमेरात कैद

मुलाच्या गळ्यात गोळी अडकल्यानंतर आईने त्याला पाणी प्यायला दिले. ज्यामुळे गोळी आणखी खाली गेली आणि मुलाला श्वास घेणेही कठीण झाले. त्यानंतर कुटुंबियांनी मुलाला जवळच्या रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र अनेक प्रयत्न करूनही डॉक्टरलाही घशातून गोळी काढता आली नाही. पण कुटुंबियांनी आरोप केला की, दिवाळीमुळे रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नव्हते.

याशिवाय कुटुंबियांनी मुलाला तीन ते चार रुग्णालयात नेऊन दाखविले. मात्र तेथील डॉक्टरांनी उपचार करण्यास असमर्थतता दाखविली. तीन तास संघर्ष केल्यानंतर अखेर लहान मुलाचा मृत्यू झाला. यानंतर आता कुटुंबियांनी गोळी बनविणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ज्या दुकानातून ही गोळी विकत घेतली होती, त्याने दुकानाला टाळे ठोकून तिथून पळ काढला आहे. पोलिसांनी दुकानदाराला शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. तसेच राज्याच्या अन्न व औषध विभागाने या प्रकरणात लक्ष घालून गोळी उत्पादित करणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे.

Story img Loader