UP By Election : महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यात विधानसभेसाठी आज (२० नोव्हेंबर) मतदान पार पडले आहे. या मतदानानंतर निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. मात्र, या निवडणुकीबरोबर उत्तर प्रदेशमधील नऊ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्येही निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मात्र, अशातच सात पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या माहितीनुसार, मतदारांना तपासण्यासाठी आणि निवडणुकीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्या प्रकरणी सात पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

Karhal Dalit Woman Murder
भाजपाला पाठिंबा दिला म्हणून दलित तरुणीचा खून; उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतील घटनेने खळबळ
RBI Deepfake Video
RBI Deepfake Video : गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा…
Election Commission of india, EVM machines, lok sabha result 2024
यंदा निवडणुकीत पैशांचा पाऊस, जाणून घ्या किती हजार कोटी जप्त केले?
Jharkhand Assembly Election 2024 Voting Updates
Jharkhand Assembly Election 2024 Phase 2 Voting : दुपारपर्यंत झारखंड पन्नाशीच्या उंबरठ्यावर; अजूनही मतांच्या टक्केवारीत महाराष्ट्र पिछाडीवरच!
Phuket to delhi airplane
पाच तासांच्या प्रवासाला चार दिवस, फुकेत-दिल्ली विमानातील ३० प्रवाशांना मनस्ताप
Vladimir putin india visit
पुतिन यांचा भारत दौरा लवकरच!
india 56th tiger reserve
५६वा व्याघ्रप्रकल्प लवकरच, छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प
Mallikarjun kharge Manipur violence
मणिपूरमध्ये हस्तक्षेप करा! मल्लिकार्जुन खरगे यांचे राष्ट्रपतींना पत्र
no alt text set
Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”

हेही वाचा : RBI Deepfake Video : गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; आरबीआयचा नागरिकांना सावधानतेचा इशारा

माहितीनुसार, कानपूरमध्ये दोन, मुझफ्फरनगरमध्ये दोन आणि मुरादाबादमध्ये एका पोलिसाला निलंबित करण्यात आलं आहे. तसेच तिघांना मुरादाबादमधील ड्युटीवरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून निवडणूक अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र, समाजवादी पक्षाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर उत्तर प्रदेशमधील काही मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काही समुदायांना मतदान करण्यापासून रोखल्याबद्दल तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी मतदाराची स्लिप फाडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर कानपूरमधील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या अधिकाऱ्यांनी मतदाराला परत पाठवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, याची आयोगाने गंभीर दखल घेत ही कारवाई केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, यानंतर निवडणूक आयोगाने म्हटलं की, “कोणत्याही पात्र मतदाराला मतदान करण्यापासून रोखले जाऊ नये. मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारची पक्षपाती वृत्ती खपवून घेतली जाणार नाही. तक्रार आल्यानंतर त्वरित तपास केला जाईल. कोणी दोषी आढळल्यास, कठोर कारवाई केली जाईल,” असं निवडणूक आयोगाने म्हटले आहे.