उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात एका महिलेचा २ जणांनी आधी पाठलाग केला आणि नंतर अक्षरशः फरफटत नेल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झालाय. यानंतर उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांवर सडकून टीका होत आहे. वाढता दबाव पाहता पोलिसांनी या महिलेचा शोध सुरू करून गुन्हा नोंदवला आहे.

नेमकं काय घडल?

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, “मी कामानिमित्त खुर्जनगर येथील माझ्या नातेवाईकांना भेटायला गेले होते. यावेळी माझ्या नातेवाईकांनी माझा छळ केला आणि त्यामुळे मी तेथून पळून गेले. मात्र, पळून जाताना दोघांनी मला पकडलं आणि माझ्यावर अत्याचार केला.”

सीसीटीव्हीत काय दिसतंय?

सीसीटीव्हीवरील तारखेप्रमाणे ही घटना २४ नोव्हेंबरला रात्री १० वाजून ५९ मिनिटांनी घडली. यात एक महिला पळत येते आणि एक दरवाजा ठोठावत असल्याचं दिसतं. मात्र, तेवढ्यात दोन जण येऊन या महिलेला दरवाजासमोरून खेचतात आणि खाली पाडतात. त्यानंतर ते या महिलेला जमिनीवरून अक्षरशः फरफटत नेताना दिसतात.

हेही वाचा : “खास आरोपीला फायदा व्हावा म्हणून प्रयत्न”, सर्वोच्च न्यायालयानं योगी सरकारला फटकारलं

आरोपींनी महिलेवर अत्याचार करून तिला बुलंदशहातील एका शाळेजवळ सोडून दिलं. तसेच झालेल्या प्रकाराची तक्रार केल्यास त्याचे परिणाम भोगण्याचीही धमकी पीडित महिलेला देण्यात आली. पोलिसांनी आरोपींविरोधात विनयभंग, अत्याचार आणि धमकी या कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.

Story img Loader