Hathras Stampede Updates : हाथरस येथे एका सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत १२१ लोक ठार आणि अनेक जण जखमी झाल्यानंतर मुख्य स्वयंसेवक देवप्रकाश मधुकर आणि इतर अज्ञातांसह आयोजकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, आयोजकांनी ८० हजार लोकांच्या मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु, या कार्यक्रमात तब्बल अडीच लाखांहून अधिक जमले होते. तसंच, त्यांच्यावर पुरावे बदलण्यात आल्याचेही आरोप आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मंगळवारी सायंकाळी उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११६ जणांचा मृत्यू झाला. आता मृतांच्या संख्येत आता वाढ झाली असून १२१ वर पोहोचली आहे. तर, शेकडो भाविक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंगळवारी स्थानिक धर्मोपदेशक नारायण साकार विश्व हरी उर्फ ​​भोले बाबा यांनी आयोजित केलेल्या सत्संगाच्या वेळी ही चेंगराचेंगरी झाली. “या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा हजारो लोक आले होते. भोले बाबांनी सत्संगस्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता गर्दी जमली. त्यासाठी लोक जमिनीवर पसरले होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत भाविक जवळ असलेल्या नाल्यात पडले,” अशी माहिती उत्तर प्रदेशचे महासचिव मनोज कुमार सिंग यांनी दिली.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार

हेही वाचा >> Hathras Stampede : चेंगराचेंगरीत १२१ जण ठार झाल्यानंतर भोले बाबा कुठे गेले? शोधमोहिमेनंतर पोलीस म्हणाले…

एफआयरामध्ये काय म्हटलंय?

एफआयआरनुसार, आयोजकाने या कार्यक्रमात सुमारे ८० हजार भाविकांना एकत्र येण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु, या संस्थेने यापूर्वी आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी लाखो भाविक जमले होते हे उघड केले नव्हते. तसंच, मंगळवारच्या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यांतून आणि जवळपासच्या राज्यांतून सुमारे अडीच लाख लोक जमले होते. परवानगीच्या अटींचे पालन न केल्याने जीटी रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती.

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०५, ११०, १२६ (२), २२३ आणि २३८ अंतर्गत मुख्य स्वयंसेवक देवप्रकाश मधुकर आणि इतर अज्ञात आयोजक आणि स्वयंसेवकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांनी मंगळवारी सांगितले की उपदेशक नारायण साकार विश्व हरी उर्फ ​​भोले बाबा यांच्यावर कारवाई केली जाईल, परंतु या प्रकरणात दाखल झालेल्या पहिल्या एफआयआरमध्ये त्यांचे नाव नाही. दरम्यान, एफआयआरमध्ये भोले बाबाचे नाव नसल्याने मृतांच्या कुटुंबीयांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लोक बाबांमुळे आले होते. त्यामुळे भोले बाबाला मुख्य आरोपी मानलं पागिजे, असं स्थानिकाने पीटीआयला सांगितले.