मागील जवळपास तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. दरम्यानच्या काळात शेकडो लोकांची हत्या करण्यात आली आहे. तर हजारो घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या दररोज नवनवीन घटना समोर येत आहेत. अलीकडेच मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली होती. एवढंच नव्हे तर जमावाने एका महिलेवर सामुदायिक बलात्कारही केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटले. यावर आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मणिपूरमध्ये दोन महिलांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “एक बाब आपल्या सर्वांना समजून घ्यायला हवी. भारतातील लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक घटनात्मक संस्थांची एक लक्ष्मणरेषा आहे. या रेषेवर जेव्हा आक्रमण होईल, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते. मणिपूर हिंसाचारासाठी तुम्ही केंद्र आणि राज्यसरकारला दोषी ठरवत आहात. पण मणिपूरमध्ये शांतता असावी, ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up cm yogi aadityanath on manipur violence women naked and paraded rmm