उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात लखनऊच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊ पोलिसांनीच योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार करण्याची धमकी आली होती. त्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. ANI या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशमध्ये आपात्कालीन विभागाने ११२ हा नंबर मदतीसाठी जारी केला आहे. याच क्रमांकावर एका अज्ञाताने फोन केला होता. त्यावर मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लवकरच ठार करणार आहे असं या अज्ञात व्यक्तीने धमकावलं. ही धमकी येताच हा फोन घेणाऱ्या ऑपरेटरने पोलिसात तक्रार दिली आहे. ज्यानंतर कलम ५०६, कलम ५०७ आणि आयटी अॅक्ट कलम ६६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणात लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देणारा अज्ञात कोण आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत. शिखा अवस्थी यांनी हा धमकीचा फोन उचलला होता.

योगी आदित्यनाथ यांना आधीही देण्यात आली आहे धमकी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पहिल्यांदा ठार करण्याची धमकी देण्यात आलेली नाही. योगी आदित्यनाथ सरकार जी कठोर पावलं उचलत आहे त्यामुळे याआधीही योगी आदित्यनाथ यांना धमकी देण्यात आली आहे. एक आठवड्यापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली होती. ही फेसबुक पोस्ट बागपला राहणारे अमन रजा यांच्या प्रोफाईलवरून शेअर करण्यात आली होती. ही पोस्ट व्हायरल झाली होती. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत आरोपीला अटक केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up cm yogi adityanath receives death threat case registered scj
Show comments