लोकसभा निवडणूक निकालांनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार आहे. ही भेट गोरखपूरमध्ये होणार आहे. २०१४ मध्ये भाजपाने २८२ जागा जिंकल्या होत्या, तर २०१९ मध्ये ३०३ झाली होती. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकींत भाजपाचे २४० खासदारच निवडून आले. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये सर्वात मोठा फटका भाजपाला बसला. या संबंधी दोघांमध्ये चर्चा आणि वैचारिक मंथन होण्याची चिन्ह दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत यांच्यात चर्चा होणार

योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटी दरम्यान निवडणूक निकालांमध्ये काय घडलं ? पुढची रणनीती कशी असेल? या सगळ्या बाबत बातचीत होऊ शकते. गोरखपूरमध्ये ३ जुलैपासून प्रशिक्षण वर्ग सुरु होणार आहे. २८० स्वयंसेवक यामध्ये सहभागी होणा आहेत. निवडणूक निकाल लागल्यानंतर मोहन भागवत यांनी चिमटे काढत, मणिपूरचा प्रश्न निकाला लावा सांगत महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. दुसरीकडे गोरखपूरच्या प्रशिक्षण वर्गात मोहन भागवत काय बोलणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. संघ विस्तार कसा होईल? राजकीय घटना काय काय? या सगळ्यांबाबतही मंथन होईल अशी चिन्हं आहेत. त्यामुळे आता या भेटीदरम्यान काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- “मणिपूर भारताचा महत्त्वाचा भाग, काल परवाच तिथे…”; मोहन भागवतांच्या विधानानंतर सुप्रिया सुळेंची मोदी सरकारवर टीका!

शाखांची संख्या वाढवली जाणार?

मिळालेल्या माहितीनुसार सरसंघचालकांनी शाखांची संख्या वाढवण्यावर आणि विस्तारवादावर जोर दिला आहे. संघाचं काम काय ते लोकांपर्यंत पोहचवण्यासही सांगण्यात आलं आहे. लोकसभेत भाजपा आणि एनडीएने ४०० पारचा नारा दिला होता. त्यापैकी ३७० जागा आपण आपल्या बळावर जिंकू असंही भाजपाने म्हटलं होतं. प्रत्यक्षात भाजपाला २५० ही संख्याही स्वबळावर गाठता आलेली नाही. या सगळ्या दिवसानंतर सरसंघचालक आणि संघाच्या इतर नेत्यांची वक्तव्य समोर येत आहेत. सातत्याने भाजपाला पराभवावरुन ऐकवलं जातं आहे.

इंद्रेश कुमार यांनी भाजपावर केली टीका

आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणूक निकालानंतर एक लेख लिहून भाजपाला अहंकारी म्हटलं आहे. तर इंडिया आघाडीला राम विरोधी म्हटलं आहे. ज्यांनी रामाची भक्ती केली त्यांच्यात हळूहळू अहंकार आला. तरीही लोकांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांना निवडलं. तर ज्यांनी रामाला विरोध केला ते रामविरोधी आहेत. असंही त्यांनी म्हटलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांची भेट महत्त्वाची मानली जाते आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up cm yogi adityanath to meet rss chief mohan bhagwat in gorakhpur scj
Show comments