UP Crime : अमेठीमध्ये गुरुवारी शाळेतील शिक्षकाच्या संपूर्ण कुटुबांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून चंदन वर्माची ओळख पटवली असून शिक्षकाची बायको आणि चंदन एकमेकांच्या संपर्कात होते, असं पोलिसांनी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

एका सरकारी शाळेतील शिक्षक सुनील कुमार (३४) यांना १८ ऑगस्ट रोजी त्यांच्या पत्नीच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी पत्नीला एससी/एसटी कायद्यांतर्गत चंदनविरुद्ध एफआयआर नोंदवायला लावला. चंदनने कुटुंबाला धमकी दिल्याचा आरोप या एफआयआरमधून केला गेला. तसंच, आमच्या कुटुंबाला कोणतीही इजा झाल्यास चंदनला जबाबदार धरण्यात यावं, असंही त्यांनी तक्रारीत नमूद केलं होतं.

In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
gambler man dies after jumped from second floor of the building over police action fear svk 88 zws
पुणे: जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा पडताच दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी, उपचारादरम्यान मृत्यू
Woman In Bengaluru Killed Body Chopped
Bengaluru Murder : महालक्ष्मी हत्या प्रकरणातील संशयित आरोपीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गुन्ह्याची कबुली
women prostitution, Nagpur, husband Nagpur,
देहव्यवसायाच्या दलदलीतून बाहेर पडत ती पुन्हा संसारात रमली
Due to indebtedness women try to commit suicide in Indrayani river Alandi
आळंदी: इंद्रायणी नदीत ‘ती’ मृत्यूची वाट पाहत बसली; पण नियतीला काही वेगळच…
Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
vladimir putin in touch with india china brazil over ukraine war
अन्वयार्थ : पुतिन यांचे ‘मित्र’ !

हेही वाचा >> Doctor Murder : “शेवटी २०२४ मध्ये हत्या केलीच”, डॉक्टरच्या हत्याप्रकरणी अल्पवयीन मुलगा गजाआड; सोशल मीडिया पोस्टही चर्चेत!

ही तक्रार केल्यानंतर शिक्षकाची पत्नी आणि चंदन एकमेकांच्या संपर्कात नव्हते. परंतु, काही दिवसांनी चंदनने त्यांच्या कुटुंबाला त्रास देण्यास पुन्हा सुरुवात केली. सुनीलशी लग्न करण्यापूर्वी त्याच्या पत्नीचे चंदनबरोबर प्रेमसंबंध होते, असं पोलिसांनी सांगितलं.

“आज लोकांचा मृत्यू होईल” असा व्हॉट्सअॅप स्टेटस अन्

गुरुवारी चंदनने पीडितेच्या घरात घुसून सुनील, त्याची पत्नी आणि दोन मुलींची हत्या केली. त्याने शिक्षकाला तीन वेळा, पत्नीला दोनवेळा आणि दोन्ही मुलींना प्रत्येक एक एक वेळा गोळ्या झाडल्या. एवढंच नव्हे तर हत्या करण्यापूर्वी त्याने स्टेटसला ठेवले होते की आज पाच लोकांचा मृत्यू होईल. हत्या केल्यानंतर जवळच असलेल्या मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या राम मनोहर यादव याला गोळीबाराचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुटुंबाला पाहून त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलावलं.

सुनील आणि त्याची पत्नी अंगणातील नळाजवळ मृतावस्थेत पडले होते. तर त्यांच्या दोन्ही मुली १० फूट अंतरावर पडल्या होत्या. शिक्षक होण्यापूर्वी सुनीलने युपी पोलिसांत काम केले होते. १२ मार्च २०२१ पासून ते अमेठीतील पन्हौना प्राथमिक शाळेत शिकवत होते.

अमेठीचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक हरेंद्र कुमार म्हणाले, सुनीलचे वडील राम गोपाल यांच्या तक्रारीवरून चंदनविरोधात खुनाच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे. सुनील कुमार यांचे वडील राम गोपाल कुमार म्हणाले की, “ज्या पद्धतीने माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे, त्याचप्रमाणे आरोपीचा मृत्यू झाला पाहिजे.”