उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक एन्काऊंटर झाल्याची माहिती समोर येत आहे. कुख्यात गँगस्टर अनिल दुजाना हा या एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने मेरठ येथे ही कारवाई केली. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेश स्पेशल फोर्स टास्कचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ यश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल दुजानावर २५ गुन्हे दाखल होते. यामध्ये १८ गुन्हे हत्येचे होते. दंगल, दरोडा, लुटमार आणि खंडणीसारखेही गुन्हे त्याच्यावर दाखल होते. “पश्चिम युपीचा कुख्यात गुंड अनिल दुजाना युपी एसटीएफच्या मेरठ युनिटसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. त्याच्यावर अनेक खटले होते. तो कॉन्ट्रॅक्ट किलर होता. त्याच्यावर १८ खुनाचे खटले होते. पुढील तपास सुरू आहे”, अशी माहिती अमिताभ यश यांनी एएनआयला दिली.

कोण आहे अनिल दुजाना?

अनिल दुजानाचे मूळ नाव अनिल सिंग असे आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशातील दुजाना गावातील असल्याने त्याची ओळखही तीच बनली. दोन भाऊ, बहिणीसह त्याच्या कुटुंबात पाचजण आहेत. ५.५ लाख रुपयांची चोरी करून त्याने २००२ साली एकाची हत्या केली होती. तेव्हापासून तो पोलिसांच्या रडारवर होता. अखेर आज झालेल्या चकमकीत तो मारला गेला.

असदचे एन्काऊंटर

गेल्या महिन्यातही उत्तर प्रदेशात एन्काऊंटर झाला होता. या चकमकीत कुख्यात गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा असद अहमद मारला गेला. उमेश पालप्रकरणात तो पोलिसांच्या रडारवर होता. असद चकमकीत ठार झाल्यानंतर दोनच दिवसांनी अतिक आणि त्याचा भाऊ असदची मारेकऱ्यांनी हत्या केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up gangster anil dujana killed in encounter in meerut sgk