उत्तरप्रदेश सरकारचा अजब कारभार
नोएडामधील वाळू माफियांविरुद्ध कारवाई करणाऱया आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांना उत्तरप्रदेश सरकारकडून निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुर्गा शक्ती नागपाल यांनी गेल्या काही महिन्यांपासून वाळूमाफियांविरुद्ध कारवाई करत सर्व अवैध व्यवहार ठप्प केले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात वाळू माफिया सक्रीय झाले होते. त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला जात होता आणि अखेर रविवारी सरकारकडून त्यांना निलंबनाची नोटीस देण्यात आली आहे. तर पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, “हा प्रशासकीय निर्णय आहे. त्यांनी धार्मिक स्थळाचे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते.” असे उत्तरप्रदेश मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट केले आहे. तसेच वाळू माफियांवरील कारवाईबरोबरच नागपाल यांनी शनिवारी ग्रेटर नोएडा परिसरात सरकारी जमिनीवर अवैधरित्या उभारण्यात आलेली मशीद पाडण्याचे आदेश दिले होते. या निर्णयामुळेच त्यांना निलंबित करण्यात आल्याचे, उत्तर प्रदेश सरकारकडून सांगण्यात येत आहे
वाळू माफियांविरुद्ध कारवाई केली म्हणून आयएएस अधिकारी निलंबित!
नोएडामधील वाळू माफियांविरुद्ध कारवाई करणाऱया आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांना उत्तरप्रदेश सरकारकडून निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
First published on: 29-07-2013 at 11:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up ias officer who took on sand mafia suspended