उत्तर प्रदेशमधील एटा येथील एका व्यक्तीने फोनवरुन आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिला आहे. आईच्या घरी आजारी आजीला भेटण्यासाठी गेलेल्या या महिलेला घरी येण्यास दहा मिनिटे उशीर झाल्याने पतीने फोनवरुनच तिला तलाक दिल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

पिडीत महिलेने एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, मी अर्ध्या तासामध्ये घरी येते असं सांगून ती घरातून निघाली होती. मात्र तिला घरी पोहचायला अर्ध्या तासाहून अधिक उशीर झाल्याने पतीने मला घटस्फोट दिल्याचं सांगितलं. ‘माझी आजी आजारी असल्याने तिला भेटण्यासाठी मी माझ्या आईच्या घरी गेले होते. अर्ध्या तासामध्ये घरी परत यायचं असं माझ्या पतीने मला घरातून निघताना सांगितले होते. पण मला घरी यायला १० मिनिटे उशीर झाला. त्यामुळे त्याने माझ्या भावाच्या फोनवर कॉल करुन तलाक, तलाक, तलाक एवढं म्हणून फोन ठेऊन दिला. या प्रकारामुळे मला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे,’ असं या महिलेने एएनआयशी बोलताना सांगितले.

तसेच माझ्या सासरचे लोक हुंड्यासाठी मला मारहाण करायचे असा आरोपही या महिलेने केला आहे. ‘मी घरी असताना अनेकदा सासरच्या मंडळींनी मला मारहाण केली आहे. त्यांच्या मारहाणीमुळे माझा एकदा गर्भपातही झाला आहे. माझ्या माहेरचे लोकं खूप गरीब असल्याने ते माझ्या सासरच्या मंडळींविरुद्ध काहीच कारवाई करु शकत नाही,’ असं या माहिलेचं म्हणणं आहे. आता याप्रकरणी या महिलेने सरकारची मदत मागितली आहे. ‘आता सरकारने मला न्याय मिळून द्यावा नाहीतर मी आत्महत्या करेन’ असा धमकी वाजा इशाराच या महिलेने दिला आहे.

तत्काळ तिहेरी तलाकशी संबंधीत विधेयकाला संसदेत मंजुरी मिळू न शकल्याने १० जानेवारी रोजी मोदी सरकारने मोठा निर्णय घेत यासंबंधीच्या अध्यादेशाला पुन्हा मंजुरी दिली. त्यामुळे तत्काळ तिहेरी तलाक देणे या अध्यादेशानुसार गुन्हा आहे. या गुन्हा अंतर्गत तिहेरी तलाक देणाऱ्याला तीन वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Story img Loader